Asia Cup Team India batting order: ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकाची तयारी करत असलेली टीम इंडिया सध्या अलूर येथील कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) च्या थ्री आऊल्स कॅपन्स येथे ६ दिवसांच्या तयारी शिबिरात सहभागी झाली आहे. आशिया चषक आणि काही दिवसांनी सुरू होणाऱ्या विश्वचषकापूर्वीचा सर्वात मोठा प्रश्न आहे तो टीम इंडियाच्या फलंदाजीचा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुखापतीमुळे के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यरचे दीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन आणि रवी शास्त्री आणि एबी डिव्हिलियर्ससारख्या दिग्गजांनी विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचा सल्ला दिल्याने हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. पण अलुवा येथे सुरू असलेल्या टीम इंडियाच्या सराव शिबिराने हे संकेत दिले की जेव्हा २ सप्टेंबरला आशिया चषकात भारत पाकिस्तानविरुद्ध खेळेल तेव्हा त्याची फलंदाजी कशी असेल?

आशिया कपसाठी निवडलेल्या टीम इंडियामध्ये राहुल आणि अय्यरच्या पुनरागमनाची सर्वाधिक चर्चा आहे. आयपीएल २०२३दरम्यान हाताला दुखापत झाल्यामुळे राहुल मैदानापासून दूर होता आणि नंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्याचवेळी पाठीच्या खालच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर यावर्षी मार्चपासून तो टीम इंडियातून दूर होता. अय्यरच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली आणि आता तो तंदुरुस्त होऊन टीम इंडियात परतला आहे. या दोघांनीही राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत झालेल्या सराव सामन्यांतून आपला फिटनेस सिद्ध केला. या दोघांनंतर आता प्रश्न आहे की आशिया कपमध्ये टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर कशी असेल?

हेही वाचा: IND vs PAK: आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यावर बाबर आझमचे मोठे विधान; म्हणाला, “दोन्ही संघाच्या खेळाडूंवर…”

आशिया चषकात टीम इंडियाचा संभाव्य फलंदाजीचा क्रम सरावातून मिळतो

क्रिकबझच्या अहवालानुसार, भारताने सराव शिबिरात सेंटर-विकेटचा सराव केला आणि फलंदाजांना जोडीने पाठवले. रोहित शर्मा आणि शुबमन गिलनंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरला पाठवण्यात आलं. यावरून आशिया कपमध्ये भारताची फलंदाजी कशी असेल याचे संकेत मिळतात. म्हणजेच रोहित आणि शुबमन ओपनिंगला येतील, त्यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आणि श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळेल.

वर्ल्ड कप २०१९ पासून टीम इंडियासाठी नंबर ४ बॅटिंग ऑर्डर हा एक मोठा मुद्दा बनला आहे. विश्वचषक २०१९ पासून, विराट कोहलीने २०२०मध्ये वानखेडेवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त एकदाच चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे, त्यावेळी कोहली स्वतः कर्णधार होता. २०१८ पासून कोहली आणि अय्यर यांनी एकत्र खेळलेल्या सर्व २९ सामन्यांमध्ये कोहली क्रमांक ३ वर खेळला आहे. २०२०च्या सुरुवातीपासून, अय्यर हा कायमस्वरूपी क्रमांक ४ फलंदाजीचा पर्याय म्हणून उदयास आला आहे. यादरम्यान अय्यरने फक्त एकदाच ३व्या क्रमांकावर आणि एकदा ५व्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे.

टॉप-४ नंतर के.एल. राहुल आणि सूर्यकुमार यादव यांची आणखी एक जोडी सराव सत्रात दिसली. आशिया चषकाच्या निवडीपूर्वी राहुलला किरकोळ दुखापत झाली होती, त्यामुळे तो सराव सत्रात विकेट्सच्या दरम्यान धावला नाही, परंतु शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि इतर काही नेट गोलंदाजांसमोर तो चांगली फलंदाजी करताना दिसला. के.एल. राहुलने वेगवान गोलंदाजांविरुद्ध चौकार मारले आणि फिरकीपटूंविरुद्ध उत्कृष्ट फूटवर्कचा वापर केला, तर इशान किशनने क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांच्या नेतृत्वाखाली विकेटकीपिंगचा सराव केला.

हेही वाचा: PAK vs AFG: पाकिस्तान-अफगानिस्तान सामन्यात घडला विचित्र प्रकार, दोन्ही देशांचे चाहते आपापसात भिडले; पाहा Video

आशिया कपमध्ये टीम इंडियाची फलंदाजी कशी असेल?

सराव सत्रात सूचित केल्याप्रमाणे, रोहित शर्मा आणि शुबमन गिल, त्यानंतर विराट कोहली क्रमांक ३ आणि श्रेयस अय्यर क्रमांक ४ वर सलामी देतील. टीम इंडियाने अद्याप के.एल. राहुलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतलेला नाही. राहुल खेळला नाही तर इशान किशनला यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून संधी मिळू शकते. मात्र, मग किशन पाचव्या क्रमांकावर खेळणार की गिल सलामीवीर म्हणून खेळणार, हा प्रश्न असेल, अशावेळी गिल तिसऱ्या क्रमांकावर, कोहली चौथ्या क्रमांकावर आणि अय्यर पाचव्या क्रमांकावर खेळू शकेल. दुसरीकडे, एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेल्या सूर्यकुमार यादवला अय्यरचा बॅकअप खेळाडू म्हणून घेण्यात आले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What will team indias batting order look like in asia cup shreyas iyer virat kl rahul where will rahul play find out avw
Show comments