ist timings argentina vs france fifa world cup 2022 final: फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना नेमक्या कोणत्या दोन संघांमध्ये खेळवला जाणार या प्रश्नाचं उत्तर काही तासांपूर्वीच जगाला मिळालं. दुसऱ्या उपांत्य फेरीत गतविजेत्या फ्रान्सने मोरोक्कोवर २-० अशी मात करत मोठ्या दिमाखात अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलं. या विजयासह फ्रान्सने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केलं आहे.

१८ डिसेंबरला (रविवार) कतारमधील लुसेल स्टेडियमवर अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स हा अंतिम सामना होणार आहे. फ्रान्स विश्वचषकाच्या इतिहासात चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. १९९८ आणि २०१८ मध्ये फ्रान्सने जेतेपद पटकावलं होतं. यंदा मात्र फ्रान्सला पराभूत करुन जेतेपदावर नाव कोरण्याचं आणि लिओन मेस्सीला ड्रीम फेअरवेल देण्याचा विचार अर्जेंटिना संघाचा असेल. मात्र जगातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्पर्धेमधील हा अंतिम सामना भारतीय चाहत्यांना कधी, कुठे, कसा पाहता येणार आहे हे अनेकांना ठाऊक नाही. जाणून घेऊयात याबद्दल…

IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Loksatta Lokankika Five ekankika  in Mumbai zonal finals Mumbai news
मुंबई विभागीय अंतिम फेरीत पाच एकांकिकांची धडक
England Beat New Zealand by 323 Runs in 2nd Test and win Series Joe Root Harry Brook Century
NZ vs ENG: न्यूझीलंडचा मोठा पराभव! टीम इंडियाला चीतपट करणाऱ्या किवींची घरच्या मैदानावर इंग्लंडसमोर शरणागती
IND vs AUS 2nd Test Day 2 Highlights Only Twice Any Team Win Day Night Test After Conceding First Innings Lead
IND vs AUS: ॲडलेड कसोटीत भारताची स्थिती बिकट, दुसऱ्या दिवशी निम्मा संघ तंबूत; ‘हा’ रेकॉर्ड पाहता पराभव टाळणं कठीण
IND vs AUS Controversial Umpiring Over R Ashwin LBW Appeal as Mitchell Marsh Given Out KL Rahul DRS b
IND vs AUS: राहुल आऊट अन् मार्श नॉट आऊट, तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा भारताविरूद्ध निर्णय; मैदानात नेमकं काय घडलं?
IND vs AUS: Adelaide floodlight failure forces stoppage in play twice
IND vs AUS: ऑस्ट्रेलियात लोडशेडिंग! अ‍ॅडलेडमध्ये २ वेळा बंद झाले फ्लडलाईट्स, हर्षित राणा वैतागला तर चाहत्यांनी… पाहा VIDEO
India Beat Sri Lanka by 7 Wickets in Semifinal and Enters Final of U19 Asia Cup
IND U19 vs SL U19: भारताचा U19 संघ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत, १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीने २४ चेंडूत केलं अर्धशतक; अंतिम फेरीत कोणाविरूद्ध खेळणार?

सामना कधी सुरु होणार?

उपांत्य फेरीतील दोन्ही सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्रीनंतर सुरु होऊन अगदी उशीरापर्चत चालले. त्यामुळे उपांत्य फेरीचा आनंद घेण्यासाठी चाहत्यांना जागरणं करावी लागली. मात्र अंतिम फेरीसाठी हे सारं करण्याची गरज नाही. कारण अंतिम फेरीचा सामना हा भारतीय वेळेनुसार १८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेआठ वाजता सुरु होईल. प्रत्यक्ष सामन्याला साडेआठ वाजता सुरुवात होणार असल्याने भारतीय वेळेनुसार रात्री अकराच्या आसपास नवीन विश्वविजेता कोण आहे याचं उत्तर भारतीयांना मिळेल.

विशेष आकर्षण काय?

किलियन एम्बापे आणि लिओनेल मेसी या दोघांपैकी कोण आपल्या संघाला जेतेपद मिळवून देतो हे पाहणं फार रंजक असणार आहे. २३ वर्षीय एम्बापे दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. विद्यमान विश्वविजेता असलेल्या फ्रान्सच्या विजयी संघामध्ये २०१८ सालीही एम्बापेचा समावेश होता. तर दुसरीकडे आपल्या कारकिर्दीमधील शेवटचा विश्वचषक खेळत असलेल्या मेसीसाठी विश्वचषक जिंकण्याचा अर्जेंटिनाचा प्रयत्न असेल. अर्जेंटिनाने विश्वचषक जिंकला तर डिआगो मॅरडॉनासारखा मेसी सुद्धा संघाला जेतेपद मिळवून देणार कर्णधार ठरेल.

सामना कुठे पाहता येणार?

भारतीयांना हा सामना ‘जीओसिनेमा’वर मोफत पाहता येणार आहे. इंग्रजी आणि हिंदीमधून या सामन्याचं समालोचन ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ‘स्पोर्ट्स १८’ वर हा सामना लाइव्ह प्रक्षेपित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे ‘स्पोर्टस १८ एचडी’ या वाहिनीवरही हा सामना पाहता येणार आहे.

अमेरिकेतील फुटबॉल चाहत्यांना ‘फॉक्स’, ‘फॉक्स स्पोर्ट्स १’ आणि ‘फॉक्स स्पोर्ट्स २’ वर हा सामना इंग्रजीमध्ये पाहता येईल. तर ‘टेलमुंडो’ आणि ‘युनिव्हर्सो’वर या चॅनेलवरुन स्पॅनिश भाषेत सामन्याचा आनंद घेता येईल.

Story img Loader