भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि शार्क टँक इंडियाचे सहसंस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांची नुकतीच नागपुरात भेट झाली. ज्याचा फोटो अश्नीर ग्रोव्हरने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे आणि नागपुरात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. नागपुरातील एका बिअर बारमध्ये विराट कोहलीसोबत संवाद साधताना अश्नीर ग्रोव्हर यांनी हा फोटो शेअर केला आहे. विराट कोहली आणि उद्योजक अश्नीर ग्रोवर दिल्लीचे रहिवासी आहेत. अनेक वर्षापासून ते दोघे एकमेकांना ओळखतात.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि भारत पेचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वी भेटले. बैठकीचा फोटो शेअर करताना अश्नीर ग्रोव्हरने कोहलीला नागपुरात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दोघाचे या भेटी दरम्यान खास असे कुठल्या प्रकारचे बोलणे झाले नाही.
बेन स्टोक्सबद्दल सामान्य आवड असलेले दिल्लीतील मुले काय चर्चा करू शकतात? नागपूर सामन्यासाठी कोहलीला शुभेच्छा. अश्नीर ग्रोव्हर देखील कोहलीप्रमाणेच दिल्लीचा आहे. त्याचबरोबर अष्टपैलू बेन स्टोक्स हा इंग्लिश कसोटी संघाचा सध्याचा कर्णधार आहे. हे अशा प्रकारच्या संभाषणाचा काही भाग माध्यमांसमोर आला आहे.
फिनटेक युनिकॉर्न भारत पे चे सहसंस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांनी कंपनीच्या महाव्यवस्थापक पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातील व्हायरल झालेल्या एका ध्वनिमुद्रित क्लीपमुळे ग्रोवर अडचणीत सापडले होते. यावर्षाच्या सुरुवातीला एक ध्वनिमुद्रित क्लिप समोर आली होती. त्या क्लिपमध्ये ग्रोवर कोटक महिंद्रा बँकेच्या एका कर्मचाऱ्यासोबत अपमानजनक भाष्य करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण इतके चिघळले की, ग्रोवर यांना कंपनीच्या एमडी पदावरुन बाजूला हवा व्हावे लागले.