Kieron Pollard Insta Story Viral : आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माकडून काढून हार्दिक पंड्याकडे देण्यात आले. फ्रँचायझीच्या या पावलामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते चांगलेच संतापले होते. आता टीममधील अशा काही गोष्टी समोर येत आहेत की टीमचा सपोर्ट स्टाफही त्याबद्दल नाराज आहे. मुंबईचे फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड यांनी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. पोलार्डच्या त्या पोस्टबाबत असे मानले जात आहे की त्याने कर्णधारपदातील हा बदल स्वीकारला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे किरॉन पोलार्डची इन्स्टा स्टोरी?

पोलार्डने इंस्टाग्रामवर एक कोट शेअर केला आहे, ज्यात लिहिले आहे की, “पाऊस थांबला की छत्री ओझे वाटू लागते. त्याचप्रमाणे जेव्हा फायदा संपतो, तेव्हा निष्ठाही संपते.” पोलार्डच्या या पोस्टबाबत, त्याने फ्रँचायझी मालकांना नाव न घेता टोमणा मारल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रोहितला कर्णधार पदावरुन हटवून हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवल्यामुळे पोलार्डही खूश नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रोहित शर्माने मुंबईला पाच वेळा बनवले चॅम्पियन –

आयपीएल २०२२ मध्ये, मंबई इंडियन्स संघ १४ पैकी फक्त चार सामने जिंकू शकला, ज्यामुळे त्यांना १० व्या स्थानावर स्पर्धा संपवावी लागली. आयपीएल २०२१ मध्ये संघ बाद फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सच्या या कामगिरीमुळे रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याचे लोकांचे म्हणणे आहे. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. याकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही.

हेही वाचा – Team India : ‘सध्या आमची टीम परदेशात…’, भारताच्या कामगिरीवर बोलणाऱ्या मायकल वॉनला अश्विनचे प्रत्युत्तर

पोलार्ड २०२२ मध्ये आयपीएलमधून निवृत्त झाला –

किरॉन पोलार्डचा इन्स्टाग्राम स्टोरीचा संबंध थेट मुंबई इंडियन्सशी जोडली जात आहे. पोलार्ड हा केवळ आयपीएलमधील या फ्रँचायझीचा फलंदाजी प्रशिक्षक नाही, याशिवाय तो इतर टी-२० लीगमध्ये एमआय संघाचा कर्णधारही आहे. पोलार्डने २०२२ मध्ये आयपीएलमधून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर पुढील हंगामात तो मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक बनला. त्याची ही इन्स्टाग्राम स्टोरी पोलार्ड एमआयची साथ सोडणार तर नाही ना, या दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When benefits end so does loyalty kieron pollards instagram story goes viral vbm