भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी केल्यानंतरही संघाचा पराभव झाल्यानंतर सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत केलेल्या एका विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे. आपण कसोटी क्रिकेटमधील कर्णधारपद सोडल्यानंतर माजी कर्णधार एम. एस. धोनी हा एकमेव अशी व्यक्ती होती जिने मला समोरुन मेसेज केला होता, असं विराट म्हणाला आहे. दक्षिण आफ्रिकेवरुद्धच्या मालिकेमध्ये सलग तीन सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर मागील वर्षी विराटने कसोटीचं कर्णधारपद सोडलं होतं. विराट मागील काही काळापासून सातत्यपूर्ण खेळी करण्यास अपयशी ठरत असल्याने त्याला एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदावरुनही काढण्यात आलं होतं.
नक्की वाचा >> Asia Cup 2022: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील पराभवाने भारताचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं का? भारत स्पर्धेतून बाहेर पडला?
Video: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारत पराभूत झाल्यानंतर विराटला आठवला धोनी; म्हणाला, “त्यावेळी फक्त धोनीने मला…”
पाकिस्तानविरुद्धच्या रविवारच्या सामन्यात विराटने ६० धावांची खेळी केली. मात्र भारताचा या सामन्यात पाच गडी राखून पाकिस्तानने पराभव केला.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-09-2022 at 07:44 IST
TOPICSआशिया चषक २०२४Asia Cup 2023महेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoniविराट कोहलीVirat Kohliव्हायरल व्हिडीओViral Video
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When i left test captaincy only ms dhoni messaged me among all the players i have played with before virat kohli scsg