Kuldeep Yadav fastest 150 Wickets in ODI: टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवने आशिया कप २०२३मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. यासह त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० विकेट्स घेण्याच्या बाबतीत इतिहास रचला आहे. सर्वात जलद १५० विकेट्स घेणारा कुलदीप हा चौथा आणि भारतासाठी दुसरा गोलंदाज ठरला आहे. कुलदीपने श्रीलंकेविरुद्ध शानदार गोलंदाजी केली आणि 4 विकेट्स घेतल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सर्वात जलद १५० विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज (वन डे मध्ये)
कुलदीप यादवने आशिया चषक २०२३मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध एकूण ९ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यानंतर त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० विकेट्स पूर्ण करणारा इतिहास रचला आहे. त्याने ८८ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५० विकेट्स पूर्ण केले आहेत आणि अशी कामगिरी करणारा तो चौथा फिरकी गोलंदाज ठरला आहे. याशिवाय भारतासाठी अशी कामगिरी करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे.
सर्वात जलद १५० विकेट्स (वन डे मध्ये)
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० विकेट्स घेण्याच्या यादीत पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताकचा समावेश आहे. त्याने ७८ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. याशिवाय राशिद खान (८० सामने) आणि अजंता मेंडिस (८४) यांनी सामन्यात १५० विकेट्स घेतल्या आहेत. यासह कुलदीपने ८८ सामन्यांमध्ये १५० विकेट्स घेतल्या असून सर्वात जलद १५० गडी बाद करणारा चौथा फिरकीपटू ठरला आहे.
भारताकडून १५० विकेट घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज (ODI)
सर्वात जलद १५० विकेट्स घेणारा कुलदीप यादव हा भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. या यादीत मोहम्मद शमी पहिल्या स्थानावर आहे. त्याने ८० सामन्यांत १५० विकेट्स पूर्ण केल्या होत्या. मात्र, त्यानंतर कुलदीपने ८८ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आणि अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला.
कुलदीपने पत्रकारांना सांगितले की, “निवृत्तीनंतर मी पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट घेतल्याचे मला नेहमी लक्षात राहील. माझ्यासाठी ही मोठी उपलब्धी आहे कारण पाकिस्तानचे फलंदाज फिरकीला चांगला खेळ करू शकतात. उपखंडात फिरकीचा चांगला खेळ करणाऱ्या संघाविरुद्ध तुम्ही चांगली कामगिरी करत असाल तर त्यामुळे तुमचे मनोबल वाढेल.”
शस्त्रक्रियेनंतर कुलदीप यादवने खूप मेहनत घेतली
कुलदीपने पत्रकारांना सांगितले की, “निवृत्तीनंतर मी पाकिस्तानविरुद्ध ५ विकेट्स घेतल्याचे मला नेहमी लक्षात राहील. माझ्यासाठी हा आयुष्यातील खूप मोठा क्षण आहे कारण, पाकिस्तानचे फलंदाज फिरकी गोलंदाजी चांगली खेळतात. उपखंडात फिरकीचा चांगला खेळ करणाऱ्या संघाविरुद्ध जर तुम्ही चांगली कामगिरी करत असाल तर त्यामुळे तुमचे मनोबल वाढेल.”
हा विक्रम केल्यानंतर कुलदीप पुढे म्हणाला, “हे एका रात्रीत घडले नाही. शस्त्रक्रियेनंतर पाच महिने संघापासून दूर राहणे फार वेदनादायी होते. सर्वकाही सुरळीत व्हायला वेळ लागला. मला माझी गोलंदाजीवरील पकड गमावून बसेल काय, अशी भीती वाटत होती. एकदा पूर्ण तंदुरुस्त झालो की मग पुढे बघू, असा विचार करत होतो.”
डावखुरा फिरकीपटू पुढे म्हणाला, “मी कानपूरमधील सराव सामन्यात गोलंदाजी केली आणि मला जाणवले की मी योग्य दिशेने काम करत आहे. भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतरही मी तसाच प्रयत्न केला. याआधी आयपीएलमध्येही माझी लय बिघडली होती. त्यामुळे ती सुधारण्यासाठी मला ६-७ महिने लागले होते. यापुढे लक्ष्य आता विश्वचषक २०२३ भारताला जिंकवून देणे आहे.”