इंदूरच्या होळकर मैदानात श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात, ४३ चेंडुंमध्ये ११८ धावांची खेळी करणाऱ्या रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव होतोय. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या रोहितने भारताला वन-डे मालिकेपाठोपाठ टी-२० मालिकेतही विजय मिळवून दिला आहे. इंदूरच्या टी-२० सामन्यात रोहितने आपल्या शतकी खेळीत १० उत्तुंग षटकार ठोकले. मात्र लहानपणी क्रिकेट खेळताना रोहितला आपल्या याच आक्रमक फलंदाजीमुळे जेलमध्ये जाण्याची पाळी आली होती. निवेदक गौरव कपूर याच्या “Breakfast with Champions” या कार्यक्रमात रोहितने आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अवश्य वाचा – रोहित मला ‘हजबंड हँडबुक’ सोबत तुझे ‘डबल हंड्रेड’ हँडबुकही दे- विराट कोहली

माझ्या लहानपणी दिवसभरातला बहुतांश वेळ टीव्हीवर क्रिकेटचे सामने बघण्यामध्ये जायचा. यानंतर शाळेत असताना बराचवेळ मी, माझे भाऊ आणि मित्रपरिवार सोसायटीच्या आवारात क्रिकेट खेळायचो. लहानपणीही सोसायटीत क्रिकेट खेळताना मी अनेक घरांच्या काचा फोडल्या आहेत. माझे शेजारी माझ्या या आक्रमक फलंदाजीने नेहमी त्रस्त असायचे. काही जणांनी कंटाळून पोलिसांत आमच्याविरुद्ध तक्रार केली. त्यानंतर एक दिवस पोलिसांनी घरी येऊन मला सांभाळून क्रिकेट खेळण्यास सांगितलं. यापुढे तुझी तक्रार आली तर तुला जेलमध्ये टाकेन, असा सज्जड दमच मला पोलिसांनी भरला. मात्र त्यानंतरही आम्ही क्रिकेट खेळणं कधीही सोडलं नाही.

याव्यतिरीक्त रोहित शर्माने गौरव कपूरने घेतलेल्या मुलाखतीत आपल्या खासगी आणि क्रिकेट कारकिर्दीतले अनेक किस्से सांगितले. बायको रितीकासोबतची पहिली भेट, ड्रेसिंग रुममधली सहकाऱ्यांसोबतची धमाल-मस्ती अशा अनेक खुमासदार आठवणींनी भरलेल्या या एपिसोडला सध्या सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळताना दिसतेय.