Asia Cup 2023 Opening Ceremony Live Streaming: आशिया चषक सुरू होण्यासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. बुधवारी मुलतानमध्ये यजमान पाकिस्तानची नेपाळशी लढत होईल. स्पर्धेच्या सभोवतालच्या सर्व घडामोडींमध्ये, प्रश्न असा आहे की उद्घाटन सोहळा होईल का? जर होय, तर ते केव्हा आणि कुठे आयोजित केले जाईल? तसेच कोण कोण कलाकार परफॉर्म करत आहेत आणि पाहुण्यांची यादी काय आहे.” या सर्वांची माहिती जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१५ दिवसांपूर्वी पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पीसीबीने खुलासा केला की जय शाह यांच्या व्यतिरिक्त, एसीसीच्या इतर क्रिकेट संस्थांच्या प्रमुखांनाही या सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. “पीसीबीने मुळात आयसीसीच्या डरबनमध्ये झालेल्या बैठकीत अध्यक्ष झका अश्रफ यांनी जय शाह यांना तोंडी दिलेल्या निमंत्रणाचा पाठपुरावा केला आहे.” असे सांगितले.

आशिया चषक २०२३ च्या उद्घाटन समारंभाबद्दल आत्तापर्यंत आम्हाला काय माहिती आहे?

आशिया कप २०२३चा उद्घाटन सोहळा ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. हा आशिया चषक २०२३चा उद्घाटन सोहळा पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील पहिल्या सामन्यापूर्वी होणार असून त्याचे स्टार स्पोर्ट्स आणिहॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहे. समारंभाची वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सामन्याआधी एक तास हा सोहळा आयोजित केला जाईल.

उद्घाटन समारंभात कोणते कलाकार सादरीकरण करतील?

पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम आणि भारतीय संगीतकार ए.आर. रहमान आशिया चषक २०२३च्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा: Asia Cup 2023: चाहत्यांसाठी खूशखबर आशिया कपचे सर्व सामने तुम्ही पाहू शकता विनामूल्य; कधी, कुठे? जाणून घ्या

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यातील पहिला आशिया चषक सामना कधी आणि कुठे पाहायचा?

आशिया चषक २०२३ची सुरुवात अ गटातील यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्याने होईल. ३० ऑगस्ट रोजी मुलतान क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील स्पर्धेचा सलामीचा सामना खेळवला जाईल. २०१८ सालानंतर आशिया चषक ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे आगामी एकदिवसीय विश्वचषक २०२३.

यावेळी आशिया कप २०२३ मध्ये एकूण ६ संघ सहभागी होत आहेत. यजमान पाकिस्तान व्यतिरिक्त नेपाळ आणि भारत हे गट-अ मध्ये आहेत. त्याचबरोबर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा ‘ब’ गटात समावेश आहे. आशिया कप २०२३ हा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवला जात आहे, ज्यामध्ये ४ सामने पाकिस्तानमध्ये तर ९ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.

नेपाळचा संघ प्रथमच आशिया चषक खेळणार आहे, ज्यामध्ये रोहित पौडेल संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. आशिया चषक प्रीमियर कप २०२३मध्ये, नेपाळच्या संघाने चमकदार कामगिरी केली आणि अंतिम सामन्यात युएईचा पराभव केला आणि मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरले. जागतिक क्रिकेटमध्ये नेपाळचा संघ पहिल्यांदाच पाकिस्तानशी भिडणार आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाची अलीकडची कामगिरी नेत्रदीपक आहे. पाकिस्तान संघाने अलीकडेच अफगाणिस्तानविरुद्ध ३ वन डे मालिकेत क्लीन स्वीप करून एकदिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवले. आता आशिया चषकातही पाकिस्तान संघाच्या नजरा दमदार सुरुवातीकडे असतील.

आशिया चषक २०२३चा पहिला सामना पाकिस्तानातील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचे भारतात थेट प्रक्षेपण केले जाईल. पाकिस्तान-नेपाळ सामन्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अ‍ॅपवर असेल. युजर्सना हा सामना मोबाईलवर मोफत पाहता येणार आहे.

हेही वाचा: Asia Cup 2023: “कोहलीविरुद्ध स्लेजिंग करू नका, तो कंटाळा…”, ‘या’ दक्षिण आफ्रिकी खेळाडूचा गोलंदाजांना सल्ला

आशिया कपसाठी पाकिस्तान आणि नेपाळ संघ

पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हरिस, शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी.

नेपाळ: रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुर्तेल, आसिफ शेख (यष्टीरक्षक), ललित राजबंशी, भीम शार्की, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग ऐरे, संदीप लामिछाने, करण केसी, गुलशन झा, आरिफ शेख, सोमपाल कामी, प्रतिस जीसी, किशोर महतो , संदीप जोरा अर्जुन सौद आणि श्याम ढकल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When where and how to watch asia cup 2023 opening ceremony know details avw
Show comments