Happy Birthday Rohit Sharma: भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आज (३० एप्रिल) आपला ३६वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी आणि प्रसंगी जगभरातील लोक रोहित शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या यादीत भारतीय संघ आणि आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचा स्टार स्पिन युजवेंद्र चहलचाही समावेश आहे. चहलने हिटमॅनला त्याच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या, तेव्हा रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने त्याच्यावर चोरीचा आरोप केला.
वास्तविक, चहलने रोहित शर्माला शुभेच्छा देण्यासाठी इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले. यासोबत त्याने कॅप्शन दिले आहे की, “संपूर्ण जगातील माझ्या सर्वात आवडत्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझा मार्गदर्शक रोहित, माझा सर्वात चांगला मित्र, मला जगातील इतरांपेक्षा जास्त हसवणारी व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. रोहित शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा.” चहलने पुढे लिहिले की, “रितिका सजदेह भाभी” या कॅप्शनचे श्रेय त्याने रितिका सजदेहला दिले. यामध्ये त्याने रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहलाही टॅग केले आहे.
रितिका सजदेहने युजवेंद्र चहलवर केला चोरीचा आरोप
युजवेंद्र चहलच्या या पोस्टवर कमेंट करताना रितिका सजदेहने लिहिले की, “ तू माझ्या नवऱ्याला चोरले आणि आता तू माझी कॅप्शन देखील चोरू शकतो.” असे म्हणत तिने चहलला मजेशीर रिप्लाय दिला. याशिवाय अनेकांनी रोहित शर्माला या पोस्टवर शुभेच्छा दिल्या.
रितिकाने असे का लिहिले?
वास्तविक, युजवेंद्र चहलने रोहित शर्माबद्दल जे काही लिहिले आहे, ते त्याने रितिका सजदेहने शेअर केलेल्या पोस्टवरून कॉपी केले होते. त्यामुळे रितिकाने अशी प्रतिक्रिया दिली. असो, युजवेंद्र चहल हा टीम इंडियाच्या सर्वात मजेदार क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो अनेकदा आपल्या कृत्यांमुळे चर्चेत असतो. संघात तो सर्वांचा लाडका आहे.
मुंबईचा राजस्थानशी आज होणार सामना
विशेष म्हणजे, सध्या रोहित शर्मा आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सची कमान सांभाळत आहे. मुंबईने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण ७ सामने खेळले असून, त्यात संघाने ३ सामने जिंकले आहेत. त्याचवेळी, संघ आज राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपला पुढील सामना खेळणार आहे. या दोघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. यंदाच्या मोसमात मुंबई आणि राजस्थानचे संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत.