India vs Ireland series live streaming: वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताला २-३ असा पराभव पत्करावा लागला होता. या मालिकेनतंर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर गेली आहे. दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका १८ ते २३ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामने डब्लिनमधील द व्हिलेज येथे होणार आहेत. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयर्लंडमधील मालिकेतून पुनरागमन करणार आहे.

जसप्रीत बुमराहची आयर्लंडविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. २९ वर्षीय जसप्रीत बुमराहने शेवटचे सप्टेंबर २०२२ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. जसप्रीत बुमराहने शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध हैदराबादमध्ये खेळला होता. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाच्या पाठीवर यावर्षी मार्च महिन्यात न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

IND vs ENG ODI Series Full Schedule Timings and Squads in Detail India England
IND vs ENG: भारत वि इंग्लंड वनडे मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक वाचा एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
India vs England 4th T20 Highlights in Marathi
India vs England 4th T20I Highlights: हर्षित राणाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, सलग पाचव्या टी-२० मालिकेत इंग्लडला चारली धूळ
India vs England 3rd T20 Highlights Updates in Marathi
India vs England T20 Highlights : टीम इंडियाची हुकली हॅट्ट्रिक! राजकोटमध्ये इंग्लंडने मिळवला विजय, बेन डकेटने झळकावले अर्धशतक
India vs England 2nd T20 Highlights in Marathi
IND vs ENG 2nd T20I Highlights : तिलक वर्माचा विजयी चौकार! टीम इंडियाने सलग दुसऱ्या सामन्यात मारली बाजी
Shiva
Video: “तुझा संसार…”, दिव्याचे सत्य शिवासमोर आणण्यासाठी चंदन काय करणार? ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
India Probable Playing XI for IND vs ENG 1st T20I Kolkata Pitch Report and Weather
IND vs ENG: भारत-इंग्लंड पहिल्या टी-२०साठी कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन? हवामानाचा सामन्यावर होऊ शकतो परिणाम
south suspense thriller movies
थरारक सीन्सच्या जोडीला आहेत चकित करणारे क्लायमॅक्स, मोफत पाहता येतील ‘हे’ चित्रपट

जसप्रीत बुमराहने त्यानंतर बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) येथे रिहॅब प्रक्रिया पूर्ण करुन भारतीय संघात स्थान मिळवले आहे. जसप्रीत बुमराहशिवाय त्याचा सहकारी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचेही संघात पुनरागमन झाले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कृष्णावर लंबर स्ट्रेस फ्रॅक्चरसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. विशेष म्हणजे ऋतुराज गायकवाडला या युवा संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

हेही वाचा – IPL: एमएस धोनीच्या टीमने रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘हा’ कारनामा करणारा CSK ठरला पहिला संघ

भारत विरुद्ध आयर्लंड २०२३ मालिका भारतात ब्रॉडकास्ट करणारे चॅनल –

वायकॉम18 ने भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेच्या थेट प्रक्षेपणासाठी भारतातील प्रसारण हक्क विकत घेतले आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांना वायकॉम 18 च्या मालकीच्या स्पोर्ट्स चॅनल स्पोर्टस १८ वर तिन्ही सामने लाईव्ह पाहता येतील. तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होतील.

भारत विरुद्ध आयर्लंड टी-२० मालिकेचे भारतातील लाइव्ह स्ट्रिमिंग –

भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग वायकॉम 18 च्या मालकीचे असलेले ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर उपलब्ध असेल. हे सामने जिओ सिनेमावर मोफत स्ट्रीम करता येईल. क्रिकेट चाहते जिओ सिनेमा अॅप डाउनलोड करून किंवा जिओ सिनेमा डॉट कॉम वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर ‘स्पोर्ट्स’ विभागाला भेट देऊन सर्व सामन्यांचा आनंद घेऊ शकतात.

हेही वाचा – Shreyas Iyer: गरीब मुलाला पाहून श्रेयस अय्यरच्या मनाला फुटला पाझर, ‘या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, पाहा VIDEO

भारताचे आयर्लंड दौऱ्याचे वेळापत्रक –

१८ ऑगस्ट २०२३, शुक्रवार: आयर्लंड विरुद्ध भारत, पहिला टी-२० (द व्हिलेज, डब्लिन) संध्याकाळी ७:३० वा.
२० ऑगस्ट, २०२३, रविवार: आयर्लंड विरुद्ध भारत, दुसरा टी-२० (द व्हिलेज, डब्लिन) संध्याकाळी ७:३० वा.
२३ ऑगस्ट २०२३, बुधवार: आयर्लंड विरुद्ध भारत, तिसरा टी-२० (द व्हिलेज, डब्लिन) संध्याकाळी ७:३० वा.

Story img Loader