Olympic 2024 Live Streaming in India: पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक २०२४ ला येत्या २६ जुलैपासून सुरूवात होणार आहे. जगभरातील अनेक उत्कृष्ट खेळाडू या मोठ्या स्पर्धेत जास्तीत जास्त पदक मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. भारतीय खेळाडूंनी गेल्या काही वर्षात या सर्वात मोठ्या स्पर्धेत ज्या प्रकारची कामगिरी केली आहे, ते पाहता यंदाही खेळाडू अधिकाधिक पदके मिळवतील अशी भारतीय चाहत्यांना आशा आहे. दरम्यान, भारतातील चाहत्यांना ऑलिम्पिकचे पॅरिसमध्ये हे सामने लाइव्ह कसे पाहता येणार, असा प्रश्न पडला आहे. जाणून घेऊया याचे उत्तर…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Paris Olympics 2024 साठी पात्र झालेल्या भारतीय खेळाडूंची यादी वाचा फक्त एका क्लिकवर

फ्रान्समधील पॅरिस या जगप्रसिद्ध शहरात २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक २०२४ चे सामने रंगणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये एकूण २०६ देश सहभागी होणार आहेत. भारतीय खेळाडू यंदाही नवे विक्रम रचून जास्तीत जास्त पदके जिंकण्याचा प्रयत्न करतील. भारताच्या इतिहासात सध्या एकूण ३५ ऑलिम्पिक पदके आहेत. २००८ मध्ये बीजिंगमध्ये अभिनव बिंद्राने देशातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले होते. नुकतेच नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून सुवर्णपदकांचा दुष्काळ संपवला होता. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने ही कामगिरी केली. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ॲथलिट ठरला. यंदा भारताकडे खेळाडूंचा ताफा आहे. ऑलिम्पिक सुवर्णविजेता नीरज चोप्रा, शटलर पीव्ही सिंधू, सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष जोडी आणि पुरुष हॉकी संघाला पॅरिसमध्ये पदक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे.

हेही वाचा – Olympics 2024: महिला प्रशिक्षकांचा टक्का कमी का?

Olympic 2024चे सामने भारतात लाइव्ह कुठे पाहता येणार?


पॅरिस ऑलिम्पिक २०२४ भारतात स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर SD आणि HD या दोन्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जाईल. यासोबतच दूरदर्शनच्या स्पोर्ट्स चॅनलवर लाइव्ह सामनेही पाहू शकता.

Olympic 2024चे लाइव्ह स्ट्रीमिंग मोबाईलवर कुठे पाहता येणार?


Jio Cinema ॲप आणि वेबसाईटवर पॅरिस ऑलिम्पिक २०२४चे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. जिओ सिनेमावर ऑलिम्पिक सामने पाहण्यासाठी वेगळा प्लॅन घेण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे ऑलिम्पिकचे सामने जिओ सिनेमावर विनामूल्य फ्री पाहता येतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Where to watch paris olympics 2024 in india live streaming on jio cinema app free and sports 18 sports channel bdg