आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या लिलाव नुकताच कोलकाता शहरात पार पडला. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने पहिल्याच प्रयत्नात ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस लिनला २ कोटींच्या बोलीवर संघात दाखल करुन घेतलं. कोलकाता नाईट रायडर्स संघाने लिनला करारमुक्त केल्यानंतर, त्याच्यावर बोली लावणार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र मुंबईने पहिल्याच प्रयत्नात हा प्रश्न सोडवत जोरदार श्रीगणेशा केला.

या लिलावादरम्यान संघाचे मालक आकाश अंबानी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने, आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर, आता मी कुठे फलंदाजी करायची?? असा गमतीशीर प्रश्न विचारला.

असा असेल मुंबई इंडियन्सचा संघ –

फलंदाज – रोहित शर्मा, शेर्फन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंह, ख्रिस लिन (२ कोटी रुपये), सौरभ तिवारी (५० लाख)

गोलंदाज – धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेनघन, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, मोहसीन खान (२० लाख), फॅबिअन अ‍ॅलन (५० लाख), प्रिन्स बलवंत राय सिंह (२० लाख), दिग्विजय देशमुख (२० लाख)

अष्टपैलू – हार्दिक पांड्या, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, अनुकूल रॉय, नॅथन कुल्टर-नाईल (८ कोटी)

यष्टीरक्षक – इशान किशन, क्विंटन डी-कॉक, आदित्य तरे

अवश्य वाचा – IPL 2020 : सरावादरम्यान तुझी माझ्याशी गाठ आहे ! बुमराहची नवीन खेळाडूला प्रेमळ तंबी

Story img Loader