यंदाचा विश्वचषक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवर होत असल्यामुळे संघातील गोलंदाजांची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजीला पोषक ठरणाऱया असल्या तरी गोलंदाजाला योग्य रणनिती आखता येणे गरजेचे आहे.
खेळपट्टी मदत करणारी असेल तर, त्याचा फायदा घेऊन अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचे सातत्य राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. सध्या विश्वचषकासाठीच्या संभाव्य संघात स्पर्धेचे ठिकाण लक्षात घेऊन गोलंदाजांचा भरणा करण्यात आला आहे. वेगवान आणि मध्यमगती गोलंदाजीसाठी भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, वरुण अॅरॉन, धवल कुलकर्णी, मोहित शर्मा, अशोक दिंडा हे पर्याय आहेत. अंतिम पंधरा खेळाडूंचा संघ निवडताना संघात वेगवान गोलंदाजांची सांगड घालताना ‘बीसीसीआय’ची निवड समिती कोणत्या गोलंदाजांना पसंती देते याची उत्सुकता आहे. ढोबळमानाने संघात तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश करावयाचा झाल्यास कोणाला पसंती द्यावी?

(टीप- कोणतेही तीन पर्याय निवडणे अनिवार्य आहे.)

Story img Loader