Which Indian Cricketer Paid Most Income Tax: भारतात क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय आणि फॉलो केला जाणारा खेळ आहे. क्रिकेटप्रमाणेच चाहत्यांमध्ये भारतीय क्रिकेटपटूंचेही तितकेच वेड आहे. क्रिकेटपटू हे क्रिकेट आणि जाहिरातींमधून मोठी कमाई करत असतात. त्याचबरोबर आयपीएल आणि इतर विविध लीग सामन्यांमुळे मोठी कमाई होते. यासह बक्कळ कमाई करणारे खेळाडू कर किती भरतात हा देखील एक उत्सुकतेचा मुद्दा आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात २०२३-२४ मध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने सर्वाधिक कर भरला आहे, जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फॉर्च्यून इंडियाच्या यादीनुसार, भारताचे कर भरणारे टॉप-५ क्रिकेटपटूंची नावे देण्यात आली आहेत. ज्यामध्ये भारताचा रन मशीन विराट कोहलीने सर्वाधिक तब्बल ६६ कोटी रुपयांचा कर भरला आहे. रिपोर्टनुसार, विराट कोहलीचे वार्षिक उत्पन्न १९०० कोटींपेक्षा जास्त आहे. तर २०२३-२४ मध्ये कोहलीने ६६ कोटी रुपयांचा कर भरला आहे, जो एखाद्या क्रिकेटपटूने भरलेला सर्वाधिक कर आहे.

हेही वाचा – Duleep Trophy 2024: भारतात जन्म अन् इंग्लंडकडून खेळले आंतरराष्ट्रीय क्रिकेट, कोण आहेत दुलीप सिंह? ज्यांच्या नावे भारतात खेळवली जाते मोठी देशांतर्गत स्पर्धा

सर्वाधिक कर भरणारे भारतीय क्रिकेटपटू

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने २०२३-२४ मध्ये धोनीने ३८ कोटी रुपयांचा कर भरला आहे. धोनी या वर्षी सर्वाधिक कर भरणारा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा तिसरा सर्वाधिक कर भरणार भारतीय क्रिकेटपटू आहे. सचिनची एकूण संपत्ती १४३६ कोटी रुपये आहे. तर २०२३०-२४ मध्ये सचिन तेंडुलकरने २८ कोटी रुपयांचा कर भरला आहे. तर या यादीत सौरव गांगुली चौथ्या स्थानी असून त्याने २०२३-२४ साठी २३ कोटी कर भरला आहे तर हार्दिक पंड्याने १३ कोटी कर भरला आहे.

हेही वाचा – Paris Paralympics 2024: २ सुवर्ण आणि २ रौप्य, भारताच्या पॅरा खेळाडूंनी पॅरिसमध्ये घडवला इतिहास, तिरंदाजीत पदकाला गवसणी

सर्वाधिक कर भरणारे टॉप ५ भारतीय सेलिब्रिटी

३५ वर्षीय कोहली भारतीय सेलिब्रिटींमध्ये सर्वाधिक कर भरण्याच्या बाबतीत पाचव्या स्थानावर आहे. सर्वाधिक कर भरण्याच्या बाबतीत अनुक्रमे शाहरुख खान, तामिळ अभिनेता विजय, सलमान खान आणि अमिताभ बच्चन यादीत पहिल्या ते चौथ्या स्थानी आहेत. शाहरुखने ९२ कोटी, विजयने ८० कोटी, सलमानने ७५ कोटी आणि अमिताभ बच्चनने ७१ कोटींचा कर भरला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which indian cricketer paid the most income tax in 2023 24 virat kohli 66 crore ms dhoni sachin tendulka sourav ganguly bdg