आयपीएलमध्ये सलग दहा वर्षे मुंबई टीमचं कॅप्टनपद सांभाळणाऱ्या रोहित शर्माला काढून त्याजागी हार्दिक पंड्याची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे मुंबई इंडियन्सच्या अनेक चाहत्यांनी मुंबई इंडियन्सचं इन्स्टाग्रामवरील खाते अनफॉलो केले आहे. परिणामी मुंबई इंडियन्सच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स कमी झाले आहेत. याचा फायदा चेन्नई सुपर किंग्सला झाला आहे.

इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या आधी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला संघाचा कर्णधार बनवले. मुंबईने काही दिवसांपूर्वीच गुजरात टायटन्सशी हार्दिक पंड्याचा ट्रेडऑफ केला होता. याआधी रोहित शर्मा संघाचं कर्णधारपद सांभाळत होता. रोहित दीर्घकाळ संघाचा कर्णधार राहिला. त्याच्या कॅप्टनशीपखाली मुंबईने पाचवेळा विजेतेपद पटकावले. मात्र आता रोहितला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. पंड्याने गुजरात टायटन्सला पाचवेळा चॅम्पियन बनवले आहे.

हेही वाचा >> रोहित शर्मा पायउतार होताच मुंबई इंडियन्सला लाखो फॉलोअर्सचं नुकसान; चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी!

हार्दिक पंड्याला कर्णधार बनवल्याने याचा फायदा चेन्नई सुपरकिंग्सला झाला आहे. आयपीएल संघामध्ये सर्वाधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या यादीत चेन्नई सुपरकिंग्स संघ पहिल्या क्रमांकावर आला आहे. २०१३ मध्ये सचिन तेंडुलकरच्या हातातून रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हाती घेतले. कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्या सत्रात रोहितने MI ला त्याचे पहिले IPL विजेतेपद मिळवून दिले. तेव्हापासून, MI ने आणखी चार IPL विजेतेपदे जिंकली आहेत.

चेन्नई सुपर किंग्जचे इंस्टाग्रामवर १३ मिलियन फॉलोअर्स आहेत. MS धोनीच्या नेतृत्वाखाली पाच वेळचा चॅम्पियन ठरलेला हा संघ आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वात जास्त फॉलोअर IPL फ्रँचायझी ठरला आहे.

मुंबई इंडियन्सचे १३ मिलिअम इंस्टाग्राम फॉलोअर्स होते. परंतु, हार्दिक पंड्याला कर्णाधर पद दिल्याने जवळपास एक लाखांहून अधिकांनी हे खातं अनफॉलो केल्याने आता मुंबई इंडियन्सचे १२. ९ मिलिअन फॉलोअर्स आहेत. तर, चेन्नई सुपरकिंग्सचे सध्या १३ मिलिअन फॉलोवर्स आहेत. म्हणजेच, आयपीएलमध्ये सर्वाधिक इन्स्टाग्राम फॉलोवर्सच्या यादीत चैन्नई सुपरकिंग्स पहिल्या क्रमांकावर आला असून मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे.

दरम्यान, आयपीएल २०१४ मिनी-लिलाव १९ डिसेंबर रोजी होणार आहे. हा लिलाव दुबईमध्ये होणार आहे. विदेशात आयपीएलचा लिलाव होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

Story img Loader