T20 World Cup 2024, Gautam Gambhir: २००७च्या टी-२०विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरने आगामी टी-२० विश्वचषक २०२४मध्ये टीम इंडियासाठी सर्वात त्रासदायक संघाची भविष्यवाणी केली आहे. त्याच्यामते हा संघ टीम इंडियाला पराभूत करू शकतो. कोणता असा दुबळा संघ आहे जो भारतासाठी मोठा अपसेट ठरू शकतोस? जाणून घेऊ या.

एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या अंतिम फेरीतील पराभवामुळे निराश झालेली टीम इंडिया नव्या आव्हानासाठी सज्ज होत आहे. टीम इंडियाला जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) येथे २०२४ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत, त्यांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याची चांगली संधी आहे. मात्र, गौतम गंभीरच्या मते अफगाणिस्तान टीम इंडियाच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतो.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
WTC Final Qualification Scenario How Team India Can Qualify After Falling Behind South Africa and Australia
WTC Qualification Scenario: टीम इंडिया आफ्रिका-ऑस्ट्रेलियाने मागे टाकल्यानंतर WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? कसं आहे समीकरण

‘थम्सअप’ ने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये, गंभीर, त्याचा माजी सहकारी युवराज सिंगसह, या स्पर्धेतील आवडत्या आणि स्पर्धेतील भारतीय संघासाठी असलेल्या प्रमुख धोक्यांवर चर्चा केली. गंभीरच्या मते, अफगाणिस्तान एक आश्चर्यकारक पॅकेज म्हणून उदयास आला आणि त्या संघात भारताला आव्हान देण्याची क्षमता आहे, विशेषत: टी-२० विश्वचषकाच्या या परिस्थितीत. याव्यतिरिक्त, त्याने ५० षटकांचे विश्वविजेते आणि २०२१ टी-२० विश्वचषक विजेते ऑस्ट्रेलियाकडे लक्ष वेधले जे भारतासमोर महत्त्वपूर्ण आव्हाने निर्माण करू शकतात.

हेही वाचा: Virat Kohli: “सेंच्युरियनमधील पराभवानंतरही कोहलीने संघ…”, दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ दिग्गजाने केले विराटचे कौतुक

गंभीर म्हणाला, “टी-२० विश्वचषकातील भारतासाठी सर्वात मोठा धोका अफगाणिस्तान आहे, अशा परिस्थितीत खूप त्यांना कमी लेखून चालणार नाही. ते कोणालाही अपसेट करू शकतात. विश्वचषक २०२३ एकदिवसीय विश्वचषकात त्यांनी जबरदस्त कामगिरी करून मोठमोठ्या संघाना बाहेर काढले होते. दूसरा संघ ऑस्ट्रेलिया कारण, त्यांच्याकडे प्रभावी खेळाडू आहेत. तिसरा संघ म्हणजे इंग्लंड कारण, ते टी-२० क्रिकेट जसे खेळले पाहिजे तसेच खेळतात. त्यामुळे भारताला एवढ्या सहज विश्वचषक जिंकता येणे अवघड आहे.”

दुसरीकडे, आपले मत मांडताना युवराज सिंग म्हणला की, “माझी विचार करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. मला वाटते की दक्षिण आफ्रिका टी-२० विश्वचषक जिंकेल. या संघाने टी-२० किंवा एकदिवसीय अशी एकही स्पर्धा जिंकलेली नाही. वन डे वर्ल्डकपमध्ये ज्या प्रकारे प्रगती केली आहे, ती पाहता दक्षिण आफ्रिका हा धोकादायक संघ आहे. तसंच काहीसं पाकिस्तानबद्दलही म्हणता येईल.

हेही वाचा: IND W vs AUS W: दीप्ती शर्माने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी करणारी ठरली पहिली महिला क्रिकेटपटू

गौतम गंभीरने संजू सॅमसनबाबत मोठे विधान केले

दुसरीकडे गौतम गंभीरने संजू सॅमसनबाबत मोठे विधान केले.यापूर्वी शतके झळकावूनही संजू सॅमसनला संघात ठेवले जाते की नाही हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे,” गंभीरने सांगितले. गौतम म्हणाला की, “तो किती प्रतिभावान आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. सॅमसनने ज्या प्रकारे शतक झळकावले, त्यावरून सर्वजण त्याच्या खेळीबद्दल बोलत होते, परंतु या खेळीपूर्वी त्याला क्वचितच संधी दिली गेली. कधी त्याला मॅच मिळाली, तर कधी त्याला बाहेर बसवलं गेलं. जेव्हा तुम्ही शतक झळकावता तेव्हा तुम्ही केवळ निवडकर्त्यांनाच प्रभावित करत नाही तर त्यांना तुमची निवड करण्यास भाग पाडता.”

Story img Loader