अनिल कुंबळे यांच्या वाढदिवसानिमित्त केलेलं ट्विट चाहत्यांच्या रोषामुळे बीसीसीआयने मागे घेतलं आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिलेल्या अनिल कुंबळे यांचा आज ४७ वा वाढदिवस आहे. या दिवसानिमित्त आज कुंबळेच्या माजी सहकाऱ्यांनी त्याला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. मात्र बीसीसीआयने केलेल्या ट्विटमध्ये अनिल कुंबळे यांचा उल्लेख केवळ भारताचा माजी गोलंदाज असा करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
कुंबळेचा माजी गोलंदाज म्हणून उल्लेख असलेलं बीसीसीआयचं हेच वादग्रस्त ट्वीट. चाहत्यांच्या रोषानंतर बीसीसीआयने ही ट्वीट आपल्या अकाऊंटवरुन काढून टाकलं.

मात्र कुंबळेंच्या चाहत्यांना हा प्रकार भावला नाही. त्यांनी ट्विट करत बीसीसीआयवर चांगलीच टीका केली.

या प्रकारानंतर बीसीसीआयने अनिल कुंबळेंना शुभेच्छा देणारं आणखी एक ट्विट केलं.

चॅम्पियन करंडकात अंतिम फेरीत भारताचा पराभव झाल्यानंतर अनिल कुंबळेंनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर कुंबळे आणि कोहली यांच्यातील वादाच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: While wishing anil kumble on his birthday bcci mentioned him only former bowler after criticism bcci takes down the tweet