लिस्बन : फुटबॉलमध्ये नियमभंगासाठी आतापर्यंत पंच पिवळे आणि लाल कार्ड वापरतात हे सर्वश्रुत होते. मात्र पंचांकडे एक पांढरे कार्डही असते, याची फार कोणाला कल्पना नाही. पंचांनी या पांढऱ्या कार्डचा वापर फुटबॉलमध्ये प्रथमच शनिवारी पोर्तुगाल येथील एका स्थानिक सामन्यात केला.पोर्तुगालमधील महिला फुटबॉल लीगमधील बेन्फिका विरुद्ध स्पोर्टिग लिस्बन या सामन्यात पंचांनी या पांढऱ्या कार्डचा वापर केला. फुटबॉलमध्ये कार्ड दाखवण्याची परंपरा १९७०च्या विश्वचषक स्पर्धेपासून सुरू झाली. परंतु पंचांनी पांढरे कार्ड वापरण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

पोर्तुगालमध्ये सुरू असलेल्या महिला चषक स्पर्धेत शनिवारी पूर्वार्धाच्या अखेरीस हा प्रसंग घडला. स्टेडियममधील पहिल्या रांगेतील व्यक्तीला काही त्रास जाणवू लागल्याचे पंचांना जाणवले. मग दोन्ही संघातील डॉक्टरांनी खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवताना पंचांच्या आदेशानंतर तातडीने स्टेडियममधील त्या अस्वस्थ चाहत्याच्या मदतीसाठी धाव घेतली. त्या वेळी पंचांनी दोन्ही संघांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पांढरे कार्ड दाखवत त्यांच्या कृतीचे कौतुक केले.

U19 Eng vs SA bizarre run out as Aaryan Sawant video viral
U19 ENG vs SA : धक्कादायक! विचित्र रनआऊटच्या नादात थोडक्यात वाचला फिल्डर, VIDEO होतोय व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Farmers sat bara will now linked to Aadhaar to avoid fraud
शेतकऱ्यांचे सातबारे आधारशी संलग्न; फसवणुकीचे प्रकार टळणार
green card permanent citizenship India US Donald trump visa
विश्लेषण : अमेरिकेत ग्रीन कार्ड आणि कायम नागरिकत्वामध्ये फरक काय? किती भारतीय ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत?
Ajinkya Rahane Statement on Rohit Sharma Form Ahead of Ranji Trophy Mumbai vs Jammu Kashmir
Ranji Trophy: “काय करायचं हे रोहितला सांगायची गरज नाही…”, अजिंक्य रहाणे रणजी सामन्यापूर्वी रोहित शर्माबाबत असं का म्हणाला?
Travelling on ST without a smart card is difficult Pune news
‘स्मार्ट कार्ड’विना ‘एसटी’ प्रवास अडचणीचा
Champions Trophy 2025 Yuzvendra Chahal has been closed says Aakash Chopra by BCCI Team Management
Champions Trophy 2025 : “युझवेंद्र चहलची फाईल बंद केली आहे…”, माजी खेळाडूचा बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनावर आरोप
how do you apply for a minor PAN card
Pan Card : लहान मुलांना पॅन कार्डची गरज असते का? काय आहेत त्याचे फायदे; घ्या जाणून

पांढऱ्या कार्डचा उद्देश काय?
खेळातील नैतिक मूल्य सुधारण्यासाठी आणि खिलाडूवृत्तीचे कौतुक करण्यासाठी सामन्यादरम्यान पंचांकडून पांढऱ्या कार्डचा वापर केला जातो. फुटबॉलची शिखर संघटना मानल्या जाणाऱ्या ‘फिफा’नेच हे पांढरे कार्ड सादर करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर ‘कन्कशन’चा पर्यायही ‘फिफा’ने मान्य केला आहे.

Story img Loader