Akash Deep made his Test debut for India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने युवा अनकॅप्ड वेगवान गोलंदाज आकाश दीपला पदार्पणाची संधी मिळाली आहे. भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा आकाश दीप हा ३१३ वा क्रिकेटपटू ठरला आहे. आता आपण पदार्पणवीर आकाश दीप कोण आहे? जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आकाश दीप कोण आहे?

आकाश दीपचा जन्म बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील देहरी गावात झाला. २७ वर्षीय आकाश दीप त्याच्या घातक इनस्विंग गोलंदाजीमुळे निवड समिती आणि भारतीय संघ व्यवस्थापनाच्या नजरेत आला. आकाश दीपने आयपीएलमध्ये ७ सामने खेळले असून त्यात त्याने ६ विकेट्स घेतल्या आहेत. आकाश दीपने २९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २३.१८ च्या गोलंदाजीच्या सरासरीने १०३ बळी घेतले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आकाश दीपने चार वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय आकाश दीपने एका सामन्यात एकदा १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

रोहितचे जिंकले होते मन –

आकाश दीप देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाकडून खेळतो. आकाश दीपने अलीकडेच इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यात ११ विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय आकाश दीपने इंग्लंड लायन्सविरुद्ध सराव सामन्यात दोन विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंड लायन्सविरुद्ध आकाश दीपची गोलंदाजी पाहून निवड समिती आणि भारतीय कर्णधार रोहित प्रभावित झाले होते.

हेही वाचा – IND vs ENG 4th Test : इंग्लंडचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय, आकाश दीपचे भारतासाठी पदार्पण

आकाश दीपला मिळाली पदार्पणाची कॅप –

जसप्रीत बुमराहला या कसोटीतून विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत त्याच्या जागी आरसीबीचा वेगवान गोलंदाज आकाश दीप पदार्पण केले आहे. पदार्पणाची कॅप मिळवणारा तो भारताचा ३१३ वा खेळाडू आहे. आकाशने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पदार्पणाची कॅप दिली. यावेळी आकाशची आईही त्याच्या पदार्पणाला उपस्थित होती. पदार्पणाची कॅप मिळाल्यानंतर आकाशने आईला मिठी मारली आणि भावूक झाला.

हेही वाचा – WPL 2024 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई-दिल्ली आमनेसामने, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

चौथ्या कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

इंग्लंड: झॅक क्राउली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), शोएब बशीर, टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन.

भारत : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, सर्फराझ खान, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is akash deep made his test debut for india in the 4th test matchg against england in ranchi vbm