Who is Aman sehrawat: भारताचा तरूण कुस्तीपटू अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीतील पहिलं पदक मिळवून दिलं आहे. अमनने ५७ किलो वजनी गटात भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे. अमनने पोर्तो रिकोचा कुस्तीपटू डेरियन तोई क्रूझचा १३-५ असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. अमनने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ करत कायम आघाडी ठेवली आणि कांस्यपदकाला गवसणी घातली. पण हा अमन सेहरावत नेमका आहे तरी कोण, जाणून घ्या.

हेही वाचा – २१ वर्षीय अमन सेहरावतने पॅरिसमध्ये जिंकलं कुस्तीतील पहिलं पदक, भारतीय कुस्तीची परंपरा ठेवली कायम

chess olympiad india strongest team in budapest to win gold medal
सुवर्णयशाचे ध्येय! बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील भारताच्या मोहिमेस आजपासून प्रारंभ
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
Saina Nehwal Angry on Fans Said Those who say I got Olympic medal as gift Try and get yourself up to the level of the Olympics
Saina Nehwal: ऑलिम्पिक पदक गिफ्ट मिळालं म्हणणाऱ्यांवर सायना नेहवालचा संताप; म्हणाली, “आधी ऑलिम्पिकसाठी…”
Paralympics 2024 Navdeep Singh hug Beit Sayah Sadegh
Paralympics 2024 : सुवर्णपदक जिंकल्यानंतर नवदीप सिंगने केलं असं काही की… प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान
Simran Sharma wins Bronze and Navdeep Singh clinches Silver in javelin
Paris Paralympics 2024: भालाफेकीत नीरज चोप्राला सुवर्णपदकाची हुलकावणी, पण नवदीपनं ते शक्य करून दाखवलं; भारताचा ‘गोल्ड’मॅन!
Sachin Sarjerao Khilari won Silver Medal in Men’s Shot Put in Paris Paralympics 2024
Sachin Sarjerao Khilari: मराठमोळ्या सचिन खिलारीने पॅरिसमध्ये घडवला इतिहास, ४० वर्षांनी गोळाफेकमध्ये भारताला मिळवून दिले पदक
unil Gavaskar statement regarding the series in Australia that India is expected to dominate sport news
भारताचेच वर्चस्व अपेक्षित! ऑस्ट्रेलियातील मालिकेबाबत गावस्करांचे भाकीत

कोण आहे अमन सेहरावत? (Who is Aman Sehrawat)

हरियाणातील झज्जर येथील अमनने लहानपणीच आपले आई-वडील गमावले. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर घरची आर्थिक परिस्थितीही बेताची होती, त्याच्या आजोबांनी त्याचा सांभाळ केला. याशिवाय त्याला एक लहान बहीणही आहे, जिच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारीही त्याच्या खांद्यावर आहे. तो आर्थिक संकटाचाही सामना करत होता, पण या सर्व आव्हानांना न जुमानता त्याच्या खंबीर धैर्याने त्याला इथपर्यंत नेले आहे.

सुशील कुमारला प्रेरणास्थान मानणाऱ्या अमन सेहरावतने पुन्हा एकदा देशाची मान उंचावली आहे. त्याने शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्यपदक मिळवून दिले. ५७ किलो वजनी गटात पुरुषांच्या फ्री स्टाईल कुस्तीमध्ये अमनने कांस्यपदकाच्या लढतीत पोर्तो रिकोचा कुस्तीपटू डेरियन तोई क्रूझचा पराभव केला. मात्र, इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला.

हेही वाचा – Vinesh Phogat: विनेश फोगटला पदक मिळणार की नाही? याचिकेसंदर्भात आली नवी अपडेट…

अमनने २०२१ मध्ये पहिले राष्ट्रीय विजेतेपद जिंकले. त्यानंतर तो प्रशिक्षक ललित कुमार यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेत असे. २०२२ मधील अंडर-२३ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकानंतर, सेहरावत २३ वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. एप्रिल २०२३ मध्ये, त्याने अस्ताना येथे २०२३ आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. यानंतर त्याने २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ५७ किलो गटात कांस्यपदक जिंकले.

ऑलिम्पिक २०२४ मध्ये पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत, त्याने उपांत्य फेरीत अव्वल मानांकित री हिगुचीकडून पराभूत होण्यापूर्वी व्लादिमीर एगोरोव्ह आणि झेलिमखान अबाकारोव्ह यांना तांत्रिक श्रेष्ठतेने पराभूत केले. आता त्याने कांस्यपदकाच्या लढतीत क्रुझचा पराभव करून ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पूर्ण केले.

अमन सेहरावतची कामगिरी

१९वा आशियाई खेळ (२०२३) – कांस्य
२०२३ वरिष्ठ आशियाई चॅम्पियनशिप – सुवर्ण
२०२२ अंडर-२३ वर्ल्ड चॅम्पियनशिप – सुवर्ण
२०२२ अंडर-२३ आशियाई चॅम्पियनशिप – सुवर्ण
२०२२ अंडर-२० आशियाई चॅम्पियनशिप – कांस्य
२०२४ रँकिंग सिरीज, झाग्रेब ओपन – गोल्ड
२०२४ रँकिंग सिरीज, पॉलीक इमरे आणि वर्गो जानोस मेमोरियल – रौप्य
२०२३ रँकिंग सिरीज, झाग्रेब ओपन – कांस्य
२०२२ रँकिंग सिरीज, झऊहेयर सगेहर – रौप्य
२०२२ रँकिंग सिरीज, यासर डोगू – कांस्य
२०२२ रँकिंग सिरीज, डॅन कोलोव्ह आणि निकोला पेट्रोव्ह – रौप्य