Who is all-rounder Arshin Kulkarni : अंडर-१९ आशिया कप २०२३ च्या पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारताकडून अष्टपैलू अर्शिन कुलकर्णीने चमकदार कामगिरी केली. त्याने ७० धावांची नाबाद खेळी करत ३ बळी घेतले. या खेळीमुळे अर्शिनने पहिल्याच सामन्यात आपल्या कुटुंबाचा संघर्ष आणि त्याग सार्थ ठरवण्यासाठी पहिले पाऊल टाकले. मात्र, त्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. डॉक्टरांच्या कुटुंबातून असलेल्या अर्शिनला संपूर्ण कुटुंब क्रिकेटर बनवण्यात गुंतले होते. त्याला आजीने खूप साथ दिली.
कुलकर्णी कुटुंबात डॉक्टरांचा भरणा आहे, पण सोलापूरचे बालरोगतज्ज्ञ अतुल यांना त्यांचा सर्वात धाकटा मुलगा अर्शिन याने डॉक्टरऐवजी क्रिकेटर व्हावे, अशी इच्छा होती. कारण त्यांनाही क्रिकेटची आवड होती. त्यामुळे आपल्या मुलांना क्रिकेटर बनवण्याचे त्यांचे सर्वात मोठे स्वप्न होते. अतुल कुलकर्णी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले, “माझ्या मुलीसह माझ्या कुटुंबातील प्रत्येकजण डॉक्टर आहेत.” मी क्रिकेट खेळायचो आणि अर्शीनचे आजोबाही क्रिकेट खेळायचे, असे अतुल यांनी सांगितले. सध्या ते अर्शिनच्या कामगिरीने खूप खूश आहेत.
अर्शिन मोबाईल विसरू शकतो, पण बॅट नाही –
अर्शिनचा सुखद प्रवास त्यागांनी भरलेला आहे. एके दिवशी अर्शिनचे प्रशिक्षक सलीम खान आणि तिलक यांनी अतुल यांना सांगितले की, त्यांचा मुलगा खूप हुशार आहे. आपल्या खेळात चमक दाखवण्यासाठी आणि व्यावसायिक क्रिकेटपटू होण्यासाठी जर तो गंभीर असेल, तर त्याला सोलापूरपासून सुमारे २५० किमी अंतरावर असलेल्या पुण्यात शिफ्ट व्हावे लागेल. त्यावेळी तो जिल्हा संघात असण्याबरोबरच महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील संघातही होता. तो अभ्यासातही चांगला होता, पण वडिलांना आपल्या मुलाची खेळाची आवड माहीत होती आणि त्याने त्याचे स्वप्न पूर्ण करावे अशी त्यांची इच्छा होती. त्याच्या वयाच्या मुलांप्रमाणे मोबाईल तर घेऊन जात नव्हता, पण तो कुठेही गेला तरी बॅट नक्कीच सोबत घेऊन जायचा.
हेही वाचा – WPL 2024 Auction : महिला प्रीमियर लीग २०२४ चा लिलाव कधी आणि कुठे विनामूल्य लाइव्ह पाहता येणार? जाणून घ्या
अर्शीनला पुण्याला घेऊन जायचे ठरले –
एका रात्री डॉक्टरांचे कुटुंबीय एकत्र बसले आणि अर्शीनचे भविष्य ठरवले. त्यांनी त्याला पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला, पण कायमचा नाही. कुटुंबाचा हा सर्वात मोठा निर्णय होता, पण त्यात अनेक अडथळेही आले. अतुल म्हणाले, “त्याची शाळा ही सर्वात मोठी समस्या होती. तो सोलापूरच्या सेंट जोसेफ स्कूलमध्ये शिकत होता. एके दिवशी मी गेलो आणि मुख्याध्यापकांना भेटलो आणि विनंती केली की अर्शिनला आठवड्यातून तीन दिवस सुट्टी द्यावी, जेणेकरून तो त्याचा क्रिकेटचा सराव चालू ठेवू शकेल. आम्ही शाळेला आश्वासन दिले की आम्ही त्याला त्याचा अभ्यास पूर्ण करण्यास मदत करू.”
आजी अर्शिनसह पुण्याला जायची –
यानंतर पुढे अर्शीनची कॅडन्स अकादमीने निवड केली. त्यानंतर कुटुंबाने त्याच्यासाठी पुण्यात भाड्याने घर घेतले. अर्शिनचे वडील म्हणाले, “बुधवारी दुपारी तो आमच्या ड्रायव्हर आणि त्याच्या आजीसह पुण्याला जायचा. त्यावेळी आजी अर्शिनसह राहत होती आणि त्याची काळजी घेत असायची. रविवारच्या सामन्यानंतर तो सोलापूरला परत येत असे. हे महाराष्ट्राच्या अंडर-१४ ते अंडर-१९ संघात असताना चालू राहिले.”
आजोबांनी स्विंगबद्दल समजावून सांगितले –
तो एक लेगस्पिनर होता आणि फलंदाजी करू शकत होता, परंतु नेटमधील त्याच्या प्रशिक्षकांना असे वाटले की त्याची शरीरयष्टी अशी आहे की तो मध्यमगती गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे त्याच्या अंडर-१६ दिवसांमध्ये त्याने मध्यमगती गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि तो अष्टपैलू खेळाडू बनला. त्याचे आजोबा देखील एक वेगवान गोलंदाज होते. त्यांनी अर्शिनला चेंडूचा सीम आणि स्विंग कसा करायचा समजावून सांगितले.
हेही वाचा – WPL 2024 Auction : महिला प्रीमियर लीग २०२४ चा लिलाव कधी आणि कुठे विनामूल्य लाइव्ह पाहता येणार? जाणून घ्या
अर्शिनला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले –
अर्शिनमध्ये समर्पण आहे आणि तो वक्तशीर आहे. तो क्वचितच नेटवर उशिरा पोहोचत असे. अशा प्रकारे त्याला आपल्या कष्टाचे फळ मिळाले. गतवर्षी तो विनू मांकड ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. यावर्षी त्याची सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेसाठीच्या वरिष्ठ महाराष्ट्र संघात निवड झाली होती, विनू मांकड करंडक बाद फेरीत निवड होण्यापूर्वी त्याने अंतिम फेरीत शतक झळकावले होते. अलीकडेच, तो महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्येही चमकला होता, जिथे त्याने १३ षटकारांच्या मदतीने शतक झळकावले होते.