D Gukesh Profile, Career, Achievements In Marathi: भारताचा १८ वर्षीय बुद्धिबळपटू डी गुकेशने इतिहास लिहिला आहे. गुकेश आता बुद्धिबळाचा बादशहा आहे. चीनचा खेळाडू आणि गतविजेता डिंग लिरेनला पराभूत करून गुकेश हा सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता ठरला आहे. गुकेशने यावर्षी सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत बाजी मारत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. मग ते कँडिडेट्स असो, बुद्धिबळ ऑलिम्पियाड असो किंवा जागतिक स्पर्धा असो. बुद्धिबळाच्या इतिहासात आपलं नाव सोनेरी अक्षरांनी उमटवणारा भारताचा लाडका बुद्धिबळपटू नेमका आहे तरी कोण, जाणून घेऊया त्याचा प्रवास.

काय आहे डी गुकेशचं पूर्ण नाव?

डी गुकेशचं पूर्ण नाव गुकेश दोम्मराजू आहे. गुकेशचा जन्म २९ मे २००६ मध्ये चेन्नईत झाला. त्याच्या वडिलांचं नाव रजनीकांत आहे आणि ते कान, नाक आणि घश्याचे सर्जन आहेत. तर त्याची आई पद्मा या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत. गुकेशने वयाच्या सातव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरूवात केली. बुद्धिबळसाठी शाळा सोडणाऱ्या गुकेशसाठी विश्वेविजेतेपद जिंकणे हा महत्त्वाचा क्षण होता. आपल्या लेकाने केलेल्या कामिगिरीमुळे हा क्षण त्याच्या वडिलांसाठी आभाळ ठेगणं करणारा ठरला आहे. एकेकाळी गुकेशच्या वडिलांनी मुलाच्या भविष्यासाठी आपलं करिअर पणाला लावलं होतं.

हेही वाचा – D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास

डी गुकेशची यशोगाथा

डी गुकेश हा त्याच शाळेचा विद्यार्थी आहे जिथून देशाला विश्वनाथन आनंदसारखे खेळाडू मिळाले आहेत. गुकेशने त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या आणि ग्रँडमास्टर असलेल्या प्रज्ञानंदला पाहून बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्यावेळी प्रज्ञानंद अंडर-१० चॅम्पियन होता. प्रज्ञानंदप्रमाणेच गुकेशनेही लहान वयातच ठरवले होते की आता बुद्धिबळ हेच आपले ध्येय आहे. याच कारणामुळे त्याने चौथीनंतर नियमित शाळेत जाणे बंद केले आणि संपूर्णपणे बुद्धिबळवर लक्ष केंद्रीत केले. गुकेशच्या स्वप्नासाठी त्याच्या आई-वडिलांनीही सर्वस्व पणाला लावले.

हेही वाचा – VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम

गुकेशचे वडील ईएनटी सर्जन आहेत. लहान असलेल्या गुकेशसह त्याचे वडिल प्रत्येक टूर्नामेंटला जायचे. महिन्यातील १५ दिवस गुकेशबरोबर प्रवास करून उर्वरित १५ दिवस शस्त्रक्रिया करत असत. गुकेशबरोबर सतत प्रवास करत असल्याचा त्यांच्या करिअरवरही परिणाम झाला. पण ते आपल्या मुलासाठी सर्वकाही करण्यासाठी तयार होते.

गुकेशच्या आईचे नाव पद्मा आहे. त्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत. गुकेशने २०१५ मध्ये आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. त्याने २०१८ मध्ये १२ वर्षांखालील जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. २०१८ च्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत त्याने ५ सुवर्णपदकं जिंकली.

हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?

फ्रान्समधील ३४वी ओपन डी कॅपेले ला ग्रँड बुद्धिबळ स्पर्धा झाल्यानंतर मार्च २०१८ मध्ये तो आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बनला. २०१९ पर्यंत तो जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर होता. त रभारताचाही सर्वात तरुण ग्रँडमास्टर आहे. विश्वविजेता बनल्यानंतर गुकेश भावूक झाला. त्याचा विजयानंतर रडतानाचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Story img Loader