Who is Dinshaw Pardiwala : समस्त भारतीय क्रीडाप्रेमी आणि कुस्तीपटूंसाठी बुधवारचा दिवस निराशाजनक ठरला. अंतिम फेरीत धडक मारलेल्या विनेश फोगट शेवटच्या क्षणी अपात्र ठरली. नियमापेक्षा अतिरिक्त वजन असल्याने तिला या अंतिम सामन्यातून आणि पर्यायाने ऑलिम्पिक २०२४ मधून अपात्र करण्यात आलं. ती यंदा सुवर्णपदक जिंकणारच अशी ठाम धारणा तयार झाली होती. परंतु, तिच्या अपात्रतेच्या बातमीमुळे संपूर्ण भारतातून हळहळ व्यक्ती केली जात आहे. दरम्यान, तिच्यावर उपचार करणारे, तिचं वजन, खाणं-पिणं या सर्व गोष्टींकडे लक्ष देणारे प्रसिद्ध डॉक्टर दिनशॉ पारडीवाला यांचीही या संपूर्ण प्रक्रियेत मोलाची कामगिरी ठरली. त्यांच्याविषय़ी जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी झालेल्या उपांत्यफेरीवेळी विनेशचं वजन ४९.९० किलो होतं. त्यामुळे तिला या सामन्यात भाग घेता आला. या दिवशी तिने सलग तीन बाऊट खेळून अंतिम फेरीत तिनं स्थान निश्चित केलं. अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली महिला ठरली. पण, उपांत्य फेरी जिंकल्यानंतर तिचं ५२.७ किलो वजन वाढलं. यामुळे भारतीय कुस्ती शिबिरात खळबळ उडाली. तिचं वजन तातडीने कमी करण्याकरता संपूर्ण फौज तयार झाली. या फौजेत प्रसिद्ध डॉकट्र दिनशॉ पारडीवालाही होते. त्यांनी तिचं वजन कमी करण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न केले.

हेही वाचा >> Vinesh Phogat : जंतर-मंतर ते पॅरिस ऑलिम्पिक! प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी अपात्र ठरली, पण…!

फायनलच्या आदल्या रात्री विनेशला झोप येत नव्हती. भारतीय संघाचे शेफ डी मिशन, गगन नारंग, दिनशॉ पार्डीवाला, विनेशचे पती, फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय कर्मचारी आणि IOA अधिकारी यांनी तिचे वजन कमी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. परंतु काही उपयोग झाला नाही.

डॉ. दिनशॉ पारडीवाला कोण? (Who is Dr. Dinshaw Pardiwala)

पारडीवाला हे बीसीसीआयचे पॅनेल केलेले डॉक्टर आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक ऋषभ पंतवर डॉ. दिनशॉ परडीवाला यांनी नुकतीच शस्त्रक्रिया केली. त्यांनी सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांसारख्या नामवंत खेळाडूंसोबतही काम केले आहे. २२ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले ते स्पोर्ट्स ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. डॉ. पारडीवाला हे मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमधील आर्थ्रोस्कोपी आणि शोल्डर सर्व्हिसेसचे संचालक आहेत आणि आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रियेतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना २००९ साली ISAKOS जॉन जॉयस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीगीर ठरण्याचा मान विनेशने मंगळवारी मिळवला होता. परंतु ही यशोगाथा अधुरीच राहिली. अपात्र ठरल्यामुळे विनेश स्पर्धकांमध्ये शेवटची आली. तिला सुवर्ण किंवा रौप्य नव्हे, तर कांस्य पदकावरही पाणी सोडावे लागले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is dinshaw pardiwala who was tryign to maintained vinesh phogat weight in paris olympics 2024 sgk