Duleep Trophy 2024 Who is Duleep Singh: दुलीप ट्रॉफी २०२४ चे सामने आजपासून म्हणजेच ५ सप्टेंबरपासून सुरू होत आहेत. बीसीसीआयने दुलीप ट्रॉफीचा फॉरमॅट बदलला आहे. याआधी ही देशांतर्गत स्पर्धा झोनल फॉरमॅटमध्ये खेळवली जात होती, मात्र आता यामध्ये चार संघ सहभागी होणार आहेत. चारही संघ बीसीसीआयने आधीच जाहीर केले आहेत. ज्यात भारत ए, भारत बी, भारत सी आणि भारत डी असे ४ चार संघ असतील. पण दुलीप ट्रॉफी ही स्पर्धा कधीपासून खेळवली जात आहे आणि दुलीप सिंह नेमके आहेत कोण हे जाणून घेऊया.

हेही वाचा – Duleep Trophy 2024 Live Streaming: दुलीप ट्रॉफीचे सामने लाईव्ह कुठे पाहता येणार? संघ, वेळापत्रक आणि सर्व डिटेल्स वाचा एकाच क्लिकवर

Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Taylor Fritz and Frances Tiafoe of the United States in the men singles semifinals at the US Open sport news
फ्रिट्झची उपांत्य फेरीत धडक, टियाफोचे आव्हान; महिलांमध्ये नवारो-सबालेन्का एकमेकांसमोर
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
The flight from Kathmandu to Delhi was hijacked on December 24, 1999.
IC814 Hijacking Case: पाकिस्तानला कॉल आणि ठाकरेंच्या ‘मातोश्री’ला लक्ष्य करण्याची योजना: मुंबई पोलिसांनी IC814 अपहरण प्रकरणाचा शोध नेमका घेतला कसा?
Wolves terrorize villages in Bahraich district of Uttar Pradesh
उत्तर प्रदेशात ‘हायब्रीड’ लांडगे बनलेत नरभक्षक! कारणे काय? बळी किती? बंदोबस्त कधी?
shrikant shinde maharashtra assembly election 2024
Shrikant Shinde in Sangli: श्रीकांत शिंदेंकडून युतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा? खानापूरबाबत जाहीर कार्यक्रमात म्हणाले…

कोण आहेत दुलीप सिंह?

भारतीय असूनही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले दुलीप सिंह यांच्या नावाने भारतात देशांतर्गत स्पर्धा दुलीप ट्रॉफी खेळवली जाते. दुलीप सिंह यांचा जन्म १३ जून १९०५ रोजी म्हणजेच ११७ वर्षांपूर्वी सौराष्ट्रच्या राजघराण्यात झाला. दुलीप सिंह हे भारतीय वंशाचे होते परंतु ते इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. एक उत्कृष्ट फलंदाज असण्यासोबतच ते त्यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठीही ओळखले जात असत. भारताला १९३२ मध्ये क्रिकेट खेळण्याचा दर्जा मिळाला. यानंतर काही काळाने दुलीप सिंह जी भारतात परतले आणि ते देशांतर्गत क्रिकेट खेळले. दुलीप सिंह हे रणजीत सिंह यांचे पुतणे होते.

हेही वाचा – Sachin Sarjerao Khilari: मराठमोळ्या सचिन खिलारीने पॅरिसमध्ये घडवला इतिहास, ४० वर्षांनी गोळाफेकमध्ये भारताला मिळवून दिले पदक

रणजी ट्रॉफी ज्यांच्या नावे खेळली जाते त्यांचा पुतण्या दुलीप सिंह

राजघराण्याचे वंशज असलेले दुलीप सिंहजींचे संपूर्ण कुटुंब क्रिकेटशी जोडलेले होते. त्यांचे काका रणजितसिंहजीही त्यांच्या वयात इंग्लंडकडून क्रिकेट खेळले होते. देशातल्या सगळ्यात प्रतिष्ठेच्या रणजी करंडक स्पर्धेला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. रणजित सिंह यांच्या चमकदार क्रिकेट कारकिर्दीमुळे दुलीप सिंह यांनीही क्रिकेटलाच करिअर म्हणून निवडले. १९२० च्या दशकात ते इंग्लंडला गेले आणि महाविद्यालयीन स्तरावर क्रिकेट खेळले. फलंदाज म्हणून पदार्पण करणारे दुलीप एक अष्टपैलू खेळाडू होते. महाविद्यालयीन स्तरावरील सामन्यात त्यांनी ३५ धावांत सात विकेट्सही घेतल्या. नंतर ते ससेक्स काउंटी क्लबकडून खेळू लागले.

भारताकडून ऑफर

१९२८-२९ च्या मोसमात, ससेक्ससाठी उत्कृष्ट कामगिरी करणारे दुलीप तेव्हा भारतात आले होते. याचदरम्यान नव्याने भारतीय क्रिकेट मंडळ स्थापन झाले होते. नव्याने स्थापन झालेल्या भारतीय क्रिकेट मंडळाने दुलीप यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांना भारतीय क्रिकेटच्या विकासात भूमिका बजावण्याची विनंती करण्यात आली. १९३२ च्या इंग्लंड दौऱ्यावर संघाचे नेतृत्व करण्याची ऑफर त्यांना देण्यात आली. दुलीप यांनी त्यांचे काका, महान रणजितसिंह यांचा सल्ला घेतला. रणजी यांनी दुलीप सिंह यांना सांगितले की, इंग्लंडकडून खेळल्यास त्यांना कदाचित अधिक चांगल्या संधी मिळतील. यानंतर दुलीप यांनी इंग्लंडसाठी पदार्पण केले.

हेही वाचा – PAK vs BAN: “हा एक वाईट संकेत आहे…” फक्त खेळाडू नाही तर PCB वरही भडकले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू; जावेद मियांदाद, इंजमाम यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष

१९३१-३२ च्या दरम्यान दुलीप हे आजारी असलेल्या रणजी यांच्यासह वेळ घालवण्यासाठी भारतात आले. भारतीय निवड समितीमध्ये दाखल झालेल्या दुलीप यांनी त्या हंगामात प्रतिभावान अमरसिंग या खेळाडूची प्रतिभा ओळखून त्यांना समोर आणले. दरम्यान, भारतात, मोईन उदौल्ला गोल्ड कपच्या अंतिम सामन्यात २१ वर्षीय विजय मर्चंट आपली उत्कृष्ट कामगिरी करत होते. काँग्रेस कार्यकारिणीने सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी डिसेंबर १९३१ मध्ये हा सामना खेळला गेला होता. ४ जानेवारी १९३२ रोजी महात्मा गांधींना मुंबईत अटक करून येरवडा तुरुंगात नेण्यात आले. व्हाईसरॉय लॉर्ड विलिंग्डन यांनी काँग्रेस पक्ष बेकायदेशीर ठरवला. गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ हिंदू जिमखान्याने १९३२ च्या क्रिकेट दौऱ्यावर बहिष्कार टाकला.

१९३२ मध्ये भारताच्या दौऱ्यावर असताना दुलीप यांनीच या दौऱ्यातील पहिल्या प्रथम श्रेणी सामन्यात भारताविरुद्ध ससेक्सचे नेतृत्व केले. पाहुण्या संघाने वोस्टरशायरचा तीन विकेट्सने पराभव केला.तेव्हा पतौडी यांनी काऊंटीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती आणि पहिल्या डावात ८३ धावा केल्या. पुढच्या महिन्यात, लॉर्ड्सवर सर्व-महत्त्वाच्या जेंटलमेन विरुद्ध खेळाडूंचा सामना झाला. दुलीपने तिसऱ्या क्रमांकावर आणि पतौडीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. दोघांनी १६१ धावांची भागीदारी करून १३२ धावा केल्या आणि नंतर डावात १६५ धावा केल्या. त्या हंगामात दोघांमध्ये जवळपास २,४०० धावा झाल्या होत्या, परंतु या धावा भारतासाठी नव्हत्या.

हेही वाचा – Hardik-Natasa: घटस्फोटानंतर लेक अगस्त्य पहिल्यांदा पोहोचला हार्दिक पंड्याच्या घरी, कृणालच्या पत्नीने शेअर केलेला VIDEO व्हायरल

ससेक्स काउंटी क्लबचे कर्णधार

१९३२ साली ते ससेक्स संघाचा कर्णधारपदी रूजू झाले. ससेक्ससाठी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्यांनी १९२९ मध्ये इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात पदार्पण केले. दुलीप सिंह यांना वयाच्या २४ व्या वर्षी इंग्लंडकडून पहिली कसोटी खेळण्याची संधी आहे. विरोधी संघ दक्षिण आफ्रिका होता. पहिल्या कसोटीत दुलीप सिंह केवळ १३ धावा करू शकले. पण कारकिर्दीतील चौथ्या कसोटीत त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध पहिले शतक झळकावले. यानंतर, त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲशेस मालिकेतील पहिल्या डावात १७३ धावा केल्या, परंतु डॉन ब्रॅडमनच्या २५४ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडने ती कसोटी गमावली. पण दुलीप सिंह यांच्या फलंदाजीची सर्वांनाच खात्री पटली.

त्यांनी १२ कसोटींमध्ये सुमारे ५९च्या सरासरीने ९९५ धावा केल्या. त्याने इंग्लंडकडून तीन शतके आणि पाच अर्धशतकेही झळकावली. मात्र, आजारपणामुळे ते सतत क्रिकेट खेळू शकले नाहीत. श्वसनाच्या आजारामुळे डॉक्टरांनी नंतर त्यांना क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

१९३२ मध्ये भारताला क्रिकेट खेळण्याचा दर्जा मिळाला होता, परंतु असे असतानाही नवाब पतौडी आणि दुलीप सिंह यांच्यासारखे क्रिकेटपटू इंग्लंडकडून खेळत राहिले. यामागचे कारण होते आगामी ॲशेस मालिका. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲशेस खेळण्यासाठी दुलीपही खूप उत्सुक होते पण आजारपणामुळे ते ॲशेस खेळू शकले नाहीत. पुढे ससेक्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दुलीप यांनी भारताविरुद्ध एक सामनाही खेळला.

भारतीय मुत्सद्दी म्हणूनही केले काम

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतात क्रिकेटला चालना मिळू लागल्याने दुलीप सिंहही भारतात परतले. त्यांनी टीम इंडियाचे निवडसमिती प्रमुख म्हणून काम केले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी भारत सरकारमध्ये नोकरीही केली. परराष्ट्र विभागाचा एक भाग असताना दुलीप सिंह यांनी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावासात अधिकारी म्हणून काम पाहिलं.