Ranji Trophy 2025 Siddharth Desai 9 wicket haul : गुजरातचा डावखुरा फिरकीपटू सिद्धार्थ देसाईने अहमदाबादमध्ये उत्तराखंडविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या सहाव्या फेरीच्या सामन्यात इतिहास घडवला. सिद्धार्थने एका डावात नऊ विकेट्स घेतल्या. मात्र, विशाल जैस्वालने एक विकेट घेतल्याने देसाईला एका डावात सर्व १० विकेट्स घेण्याचा ऐतिहासिक पराक्रम करता आला नाही. विशालने हर्ष पटवालची एकमेव विकेट घेतली. पण ३६ धावांत ९ विकेट्स घेत सिद्धार्थ देसाई रणजी ट्रॉफीच्या इतिहासात गुजरातसाठी सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे गुजरातने उत्तराखंडला अवघ्या १११ धावांवर ऑलआउट केले. त्याने आशिष झैदीच्या ९/४५ च्या विक्रमाला मागे टाकत देशांतर्गत रेड-बॉल स्पर्धेत भारताची तिसरी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. उत्तराखंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी चुकीचा ठरला.

कोण आहे सिद्धार्थ देसाई?

२४ वर्षीय सिद्धार्थ देसाई सुरुवातीपासून गुजरातकडून क्रिकेट खेळला आहे. तो गुजरातकडून १४ वर्षाखालील, १६ वर्षाखालील आणि १९ वर्षाखालील संघात खेळला आहे. रणजी ट्रॉफीमध्येही तो बराच काळ गुजरातकडून खेळत आहे. आतापर्यंत त्याने रणजीमध्ये ३६ सामने खेळले असून त्यात त्याने १५९ विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए मध्ये खेळलेल्या २० सामन्यांमध्ये सिद्धार्थच्या नावावर २५ विकेट्स आहेत. रणजी ट्रॉफी २०२२-२३ च्या हंगामात डावखुरा फिरकीपटू गुजरातसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. त्याने ६ सामन्यात ३० विकेट घेतल्या होत्या.

रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजीची आकडेवारी –

१०/४९-अंशुल कंबोज (हरियाणा विरुद्ध केरळ)-रोहतक, २०२४
९/२३ – अंकित चव्हाण (मुंबई विरुद्ध पंजाब) – वानखेडे, २०१२
९/३६ – सिद्धार्थ देसाई (गुजरात विरुद्ध उत्तराखंड) – अहमदाबाद, २०२५
९/४५ – आशिष झैदी (उत्तर प्रदेश विरुद्ध विदर्भ) – कानपूर, १९९९
९/५२ – आर संजय यादव (मेघालय विरुद्ध नागालँड) – सोविमा, २०१९

रणजी ट्रॉफीमध्ये गुजरातसाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणारे गोलंदाज –

९/३६ – सिद्धार्थ देसाई (वि. उत्तराखंड) – अहमदाबाद, २०२५
८/३१ – राकेश ध्रुव (वि. राजस्थान) – अहमदाबाद, २०१२
८/४० – चिंतन गजा (वि. राजस्थान) – सुरत, २०१७

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is gujarats siddharth desai who took 9 wickets in an innings against uttarakhand in ranji trophy vbm