Who is England’s Gus Atkinson: इंग्लंडने लॉर्ड्सवर खेळवलेल्या गेलेल्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विंडिज संघाचा एक डाव आणि ११३ धावांनी पराभव केला. लॉर्ड्सवरील हा सामना खूपच संस्मरणीय असेल कारण हा जेम्स अँडरसनचा अखेरचा कसोटी सामना होता तर दुसरं कारण म्हणजे इंग्लंडटचा पदार्पणवीर गस अ‍ॅटकिन्सने कसोटी पदार्पणातच १२ विकेट्स घेतल्या. अ‍ॅटकिन्सनने आपल्या या पदार्पणाला ऐतिहासिक बनवले आहे.

हेही वाचा – James Anderson: कोणासमोर गोलंदाजी करणं अवघड? ‘या’ दिग्गज भारतीय खेळाडूचं नाव घेत अँडरसन म्हणाला…

ICC test Rankings Harry Brook Becomes No 1 Ranked Test Batter Virat Rohit Suffer Massive Dip
ICC Test Rankings: विराट-रोहितला कसोटी क्रमवारीत धक्का, जो रूटला मागे टाकत ‘हा’ खेळाडू पहिल्या स्थानी, टॉप-१० मध्ये भारताचे किती खेळाडू?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
Travis Head Fastest Century in Day Night Test Match IND vs AUS Adelaide Test
Travis Head: ट्रॅव्हिस हेडचे डे-नाईट कसोटीत सर्वात जलद शतक, स्वत:चा रेकॉर्ड मोडत केली मोठी कामगिरी; भारत बॅकफूटवर
England reach 500000 Test runs first team to achieve landmark
England World Record: ५ लाख धावा! इंग्लंडचा कसोटी क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, कसोटीच्या १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट
Kagiso Rabada Bat Broke in t20 parts on Lahiru Kumara Ball in SA vs SL 2nd Test Watch Video
SA vs SL: चेंडूच्या वेगासमोर बॅटचे झाले दोन तुकडे, थोडक्यात वाचला कगिसो रबाडाचा हात; VIDEO होतोय व्हायरल

गस अ‍ॅटकिन्सने त्याच्या कसोटी पदार्पणाच्या सामन्यात एकूण १२ विकेट्स घेतल्या आहेत. यासह गस अ‍ॅटकिन्सने पदार्पणाच्या सामन्यात १० पेक्षा अधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडच्या ॲलेक बेडसरने १९४६ मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात १४५ धावा देत ११ विकेट घेतले होते. १९७२ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या बॉब मॅसीने १३७ धावा देत १६ विकेट घेतले होते. आता २०२४ मध्ये गस अ‍ॅटकिन्सनने १२ विकेट घेत विक्रम केला आहे. आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात दहा विकेट घेणारा गस अ‍ॅटकिन्सन इंग्लंडचा सातवा गोलंदाज ठरला आहे.

ढगाळ वातावरणामुळे इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिल्या कसोटीत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेम्स अँडरसनच्या शेवटच्या कसोटीत वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. ही भागीदारी तोडण्यासाठी बेन स्टोक्स आणि त्याच्या संघाला काहीतरी खास करण्याची गरज होती आणि पदार्पणवीर अ‍ॅटकिन्सनने सलग दोन विकेट घेत वेस्ट इंडिजला बॅकफूटवर आणले.

हेही वाचा – James Andersonने अखेरच्या सामन्यात केला विश्वविक्रम, कसोटी क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला गोलंदाज

पुन्हा एकदा विंडीजच्या फलंदाजांनी संघाचा डाव सावरत ॲलेक अथानाझ आणि कावीम हॉज यांनी चौथ्या विकेटसाठी ४४ धावा जोडल्या, ॲटकिन्सनने पुन्हा एकदा त्याच षटकात तीन विकेट घेत कॅरेबियन फलंदाजांना माघारी धाडले. त्याने अथानाझची विकेट घेतली आणि त्यानंतर जेसन होल्डरची विकेटही घेतली. दोन चेंडूंत उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने चमकदार कामगिरी केली आणि जोशुआ दा सिल्वाला शून्यावर बाद केलं. अशाप्रकारे चार चेंडूंत त्याने वेस्ट इंडिजची मधली फळी उद्ध्वस्त केली.

काही वेळातच वेस्ट इंडिजचा डाव ४१.४ षटकांत १२१ धावांवर आटोपला. गसने ४५ धावांत सर्वाधिक ७ विकेट घेतले. तर तिसऱ्या दिवशी अखेरची विकेट घेत अ‍ॅटकिन्सने वेस्ट इंडिजला ऑल आऊट करत संघाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या डावात अ‍ॅटकिन्सने १४ षटकांत ६१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा – अ‍ॅटकिन्सनची भेदक गोलंदाजी अन् इंग्लंडचा अँडरसनला विजयी निरोप, वेस्ट इंडिजचा केला लाजिरवाणा पराभव

कोण आहे गस अ‍ॅटकिन्सन? (Who is Gus Atkinson?)


गस अ‍ॅटकिन्सन हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. काऊंटी चॅम्पियनशिप आणि द हंड्रेडमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर ॲटकिन्सनचा प्रथमच इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे. द हंड्रेडमध्ये ॲटकिन्सनने इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलरविरुद्ध गोलंदाजी केली आणि त्याच्या वेगाने त्याला आश्चर्यचकित केले. ॲटकिन्सनने आतापर्यंत केवळ २० प्रथम श्रेणी सामने, ११ लिस्ट ए सामने आणि ५४ टी-२० सामने खेळले आहेत. २० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ७१ विकेट घेतले आहेत. तर ११ लिस्ट ए सामन्यांत १६ विकेट्स घेतले आहेत. तर एकूण ५४ टी-२० सामन्यांत ७२ विकेट घेतले आहेत. अ‍ॅटकिन्सला भारतात झालेल्या वनडे विश्वचषक २०२३ साठी जोफ्रा आर्चरसाठी निवडण्यात आले होते.

Story img Loader