India vs Australia, U19 World Cup Final : भारत आणि ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट संघ दोन महिन्यात पुन्हा एकदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भिडले. आज १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा आयसीसी विश्वचषक अंतिम सामन्यात एकमेकांशी सामना झाला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने मोठा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ५० षटकांमध्ये ७ बाद २५३ धावांचा डोंगर उभा केला. भारतीय फलंदाजांनी धावांचा पाठलाग केला, मात्र एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अखेर ४३ षटकात १७४ धावांवर भारताचे सर्व गडी बाद झाले. भारतीय फलंदाज अंतिम सामन्यात अपयशी ठरले असले तरी ऑस्ट्रेलियन संघातील भारतीय वंशाचा हरजस सिंग मात्र चांगलाच चमकला.

पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून फलंदाज हरजस सिंग याने सर्वाधिक ५५ धावांची (६४ चेंडूत) खेळी साकारली. हरजस सिंग याने यापूर्वी सहा सामन्यात फक्त ४९ धावा केल्या होत्या. पण अंतिम सामन्यात तो खेळपट्टीवर ठामपणे उभा राहिला आणि त्याने संघासाठी सर्वाधिक धावसंख्या उभारली. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला २५० चा टप्पा पार करता आला.

Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
ojas kulkarni of kolhapur participated in first world cup kho kh
ऑस्ट्रेलियन खो-खोची ‘ओजस्वी’ कहाणी! खेळ माहीत नसलेल्या देशाचा भारतीय ‘द्रोणाचार्य’
Adam Gilchrist says Sir Don Bradman would have troubled ahead Jasprit Bumrah in batting
Jasprit Bumrah : ‘….बुमराह असता तर ब्रॅडमनची सरासरी ९९ नसती’, आस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचं मोठं विधान
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम
Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन

भारतीय मुळ असेलला हरजस सिंग नेमका कोण आहे? असा प्रश्न आता विचारला जात आहे. त्यामुळे हरजस सिंगची पार्श्वभूमी आपण पाहुयात.

“त्या दिवशी आई-वडिलांनी…”, धोनीने सांगितलं ७ नंबरची जर्सी का निवडली? चाहत्यांकडून ‘Thala for a reason’चा ट्रेंड

कोण आहे हरजस सिंग?

हरजसचा जन्म २००५ साली सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे झाला. त्याच्या जन्माच्या पाच वर्ष आधी त्याचे वडील चंदीगढ येथून ऑस्ट्रेलियाला गेले होते. हरजसने रिव्हस्बी वर्कर्स क्रिकेट क्लबमधून वयाच्या आठव्या वर्षी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. हरजसच्या पालकांची पार्श्वभूमी क्रीडा क्षेत्राशी निगडित आहे. त्याचे वडील इंदरजीत सिंग हे चंदीगढमधील बॉक्सिंग चॅम्पियन होते. तर आई अविंदर कौर राज्य पातळीवरील लांब उडी मारणारी खेळाडू होती.

विश्वचषकाची सुरुवात झाल्यानंतर हरजसने त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती दिली होती. त्याच्या कुटुंबातील इतर नातेवाईक अजूनही चंदीगढमध्ये राहते आणि त्याने २०१५ साली शेवटची त्यांची भेट घेतली होती, असेही तो म्हणाले. “माझे काका अजूनही चंदीगढ आणि अमृतसर येथे राहतात. आमचे तिथे घरही आहे. २०१५ नंतर मी क्रिकेटमध्ये व्यस्त झाल्यामुळे मला पुन्हा भारतात जाता आले नाही”, अशी प्रतिक्रिया त्याने दिली होती.

युवा विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताच्या कोणत्या खेळाडूंकडून विशेष अपेक्षा?

आज अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरूवात काहीशी अडखळत झाली होती. राज लिम्बानी याने ओपनर सॅम कोन्स्टासला शून्यावर बाद केले. त्यानंतर कर्णधार ह्यू वेबगनही ४८ धावा करून परतला. त्यानंतर हरजस सिंगने ऑस्ट्रेलियाच्या धावफलकाचा ताबा घेतला. रायन हिक्स (२०) आणि ऑली पीक (४६) यांच्या साथीने हरज सिंगने ६४ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत ३ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. १८१ व्या धावसंख्येवर असताना सौम्य पांडेंने त्याला पायचीत (LBW) बाद केले.

Story img Loader