Neeraj Chopra Javelin Throw Final Who is Jakub vadeljch: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला भालाफेकमध्ये नीरज चोप्राकडून पदकाच्या खूप आशा आहेत. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. ॲथलेटिक्समध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकणारा तो पहिला खेळाडू आहे. यानंतर त्याच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत गेली आणि तो सर्वात मोठा स्टार खेळाडू म्हणून उदयास आला. २६ वर्षीय नीरजने आपल्या कामगिरीने संपूर्ण जगाला प्रभावित केले आहे. नीरजने पॅरिस ऑलिम्पिक पात्रता फेरीतच ८९.३४ मी लांब भाला फेकत पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. पण पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये त्याच्यासाठी हा मार्ग सोपा असणार नाही. त्याला जॅकब वडेलजकडून कडवी स्पर्धा मिळू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – India vs Spain Hockey Paris Olympics 2024: हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा कोरलं कांस्यपदकावर नाव; श्रीजेशच्या कारकीर्दीचा गोड शेवट

कोण आहे जॅकब वडेलज? (Who is Jakub vadeljch)

चेक प्रजासत्ताकचा ३३ वर्षीय खेळाडू जॅकब वडलेज गेल्या काही वर्षांपासून भालाफेकमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्याने यावर्षी डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा पराभव केला होता आणि अलीकडेच त्याने युरोपियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने सुवर्णपदक जिंकले होते, तर जॅकबने रौप्यपदक जिंकले होते. तेव्हा त्याने ८६.६७ मीटर भालफेक केली होती.

जॅकबने याशिवाय जागतिक स्पर्धेत एक रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत. तो सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्याने पात्रता फेरीत ८५.६३ मीटर फेक केली होती. त्याचा हंगामातील सर्वोत्तम थ्रो ८८.६५ मीटर आहे. वडलेजचा वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो ९०.८८ मीटर होता. नीरज आणि जॅकब २१ वेळा एकमेकांसमोर स्पर्धेत उतरले आहेत, जिथे नीरज सर्वाधिक १२ वेळा चांगली कामगिरी केली आहे.

हेही वाचा – India vs Spain: ग्लोव्हज, हेल्मेटसमोर नतमस्तक अन् मग थेट चढून गोलपोस्टवर बसून श्रीजेशने साजरा केला अखेरच्या सामन्याचा विजय, पाहा VIDEO

जॅकब वडेलजचे अलीकडचे विक्रम
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ पात्रता फेरी – ८५.६३ मी (तिसरे स्थान)
पॅरिस डायमंड लीग अंतिम फेरी – ८५.०४ मी (तिसरे स्थान)
युरोपियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप फायनल – ८८.६५ मी. (पहिले स्थान)
युरोपियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप पात्रता फेरी – ८३.३६ मी. (दुसरे स्थान)
६३वे ओस्ट्रवा गोल्डन स्पाईक फायनल – ८६.०८ मी (दुसरे स्थान)

भालाफेकमध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीमही नीरजसाठी मोठे आव्हान ठरू शकतो. नदीमने टोकियो ऑलिम्पिकमध्येही भाग घेतला होता. परंतु तो पदक जिंकू शकला नाही. मात्र जागतिक स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकावले. याशिवाय २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले आहे. त्याच्या कामगिरीने आश्चर्यचकित करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. याशिवाय नदीमने यापूर्वी ९० मीटरपर्यंत भालाफेक केली आहे, जी नीरज चोप्राने अद्याप केलेली नाही. नदीमचा सर्वोत्तम थ्रो ९०.१८ आहे. तर नीरजने आतापर्यंत केवळ ८९.९४ मीटरपर्यंत भालाफेक केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is jakub vadeljch world no 1 javelin thrower who will compete with neeraj chopra in finals of paris olympics 2024 bdg