IND vs SL 2nd ODI Who is Jaffrey Vandersey: भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ९ गडी गमावून ४० धावा केल्या. भारताचा डाव केवळ २०८ धावांवर आटोपला. श्रीलंकेने भारताचा ३२ धावांनी पराभव केला, पण श्रीलंकेन खेळाडू जेफ्री व्हँडरसेच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय संघाचा डाव कोलमडला. या खेळाडूने ७ षटकांत रोहित-विराटच्या विकेट्सह ६ विकेट घेतल्या. पण हा जेफ्री वँडरसे नेमका आहे तरी कोण, जाणून घेऊया.

हेही वाचा – IND vs SL: “तेव्हा वाईट वाटतं…” भारताच्या पराभवानंतर रोहित शर्माचं मोठं विधान, संघ नेमकं कुठे चुकला?

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
Sam Curran England Cricketer Brother Ben Curran Will Play for Zimbabwe Cricket Team
सॅम करनचा भाऊ इंग्लंड नव्हे तर ‘या’ देशाकडून खेळणार क्रिकेट, वनडे मालिकेसाठी संघात निवड

जेफ्री व्हँडरसे हा लेग स्पिनर गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीमुळेच श्रीलंकेला ३ वर्षात प्रथमच भारतावर विजय मिळवून दिला. त्याने विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे यांच्या विकेट घेतल्या. दुखापत झालेल्या लेगस्पिनर वानिंदू हसरंगाच्या जागी जेफ्री व्हँडरसेला दुसरा एकदिवसीय सामना खेळण्याची संधी देण्यात आली आणि त्याने निवडकर्त्यांना अजिबात निराश केले नाही.

हेही वाचा – Paris Olympics 2024: नोहा लायल्स ठरला जगातला वेगवान माणूस; ०.००५ सेकंदाच्या फरकासह १०० मीटर शर्यतीचं पटकावलं सुवर्णपदक

Who Is Jeffrey Vandersay: कोण आहे जेफ्री व्हँडरसे? कानामागून आला अन् तिखट झाला

श्रीलंकेचा गोलंदाज जेफ्री व्हँडरसे ३४ वर्षांचा असून तो गाम्पाहा जिल्ह्यातील वट्टाला येथील आहे. तो केवळ ३७ सामने खेळला आहे. टीम इंडियाविरुद्धचा हा त्याचा दुसरा सामना होता. व्हँडरसे टॉप स्पिन, गुगली आणि स्लाइडरसह विविध फिरकी गोलंदाजी करतो. व्हँडरसे हा उजव्या हाताचा फलंदाजही आहे. त्याने ३ अर्धशतके झळकावताना जवळपास एक हजार धावा केल्या आहेत. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला २०१५ मध्ये सुरुवात झाली. जेफ्री व्हँडरसेने पहिला टी-२० सामना ३० जुलै २०१५ रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने ४ षटकांत २५ धावा दिल्या. २८ डिसेंबर २०१५ रोजी, व्हँडरसेने क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

हेही वाचा – इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचे वयाच्या ५५व्या वर्षी निधन, ४ दिवसांपूर्वी साजरा केला होता वाढदिवस

भारताविरूद्ध खेळलेला व्हँडरसेचा हा दुसरा सामना होता, पहिल्या सामन्यात व्हँडरसेला दुखापत झाली होती, ज्यामध्ये तो स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर गेला होता. विराट कोहलीचा चौकारासाठी जाणारा चेंडू थांबवताना तो त्याच्याच संघातील अन्य एका खेळाडूलाही भिडला. या धडकेमुळे तो गंभीर जखमी झाला. अन्य एक खेळाडूही दुखापत झाली. दोन्ही खेळाडूंना स्ट्रेचरने बाहेर काढावे लागले.

जेफ्री व्हँडरसेला श्रीलंका क्रिकेट बोर्डाने केलं होतं निलंबित

जेफ्री व्हँडरसेला २०१८ मध्ये एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. त्याच्यावर नियमाचेा भंग केल्याचा आरोप होता. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर कडक कारवाई केली होती. त्याला निलंबित करताना २० टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याच्यावर मॅचच्या आदल्या रात्री हॉटेलमधून बाहेर पडून मित्रांसोबत नाईट क्लबमध्ये एन्जॉय केल्याचा आरोप होता. तो रात्रभर नाईट क्लबमध्ये राहिला. तक्रार आल्यानंतर कारवाई करून त्याला श्रीलंकेला परत पाठवण्यात आले.

Story img Loader