Juned Khan who will make his Mumbai team debut in Irani Cup 2024 : मुंबई संघाने यावेळी तब्बल २७ वर्षांनंतर इराणी चषकाचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात रेस्ट ऑफ इंडियाचा पराभव करून मुंबईने १५व्यांदा इराणी चषकाचे जेतेपद पटकावले. इराणी चषक २१०२४ मध्ये मुंबईच्या एका वेगवान गोलंदाजाचे पदार्पण पाहता भविष्यात तो संघात सामील होईल, अंदाज व्यक्त केला जात आहे. हा पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज दुसरा कोणी नसून जुनेद खान आहे. कन्नौजचा रहिवासी असलेल्या जुनेद खानचा क्रिकेट प्रवास खूप संघर्षमय राहिला आहे. डोळ्यात क्रिकेटचे स्वप्न घेऊन जुनेद खान कन्नौजहून मुंबईत पोहोचला होता, पण त्याचे स्वप्न पूर्ण करण्यात अनेक अडथळे आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वयाच्या १३ व्या वर्षी घर चालवण्यासाठी चालवला रिक्षा –

जुनैद मुंबईत आला तेव्हा तो केवळ १३ वर्षांचा होता. मुंबईत आल्यानंतर जुनेदला आधी कामाच्या शोधात असलेल्या रिक्षा चालवावी लागली. जुनेद अल्पवयीन असूनही त्याने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा चालवला आहे. तो एकदा रिक्षा चालवत संजीवनी क्रिकेट अकादमीत पोहोचला. जो मुंबईचा माजी यष्टीरक्षक मनीष बंगेरा चालवायचे. जी त्याच्या घराजवळ होती. जुनैद कन्नौजमध्ये टेनिस बॉल क्रिकेटही खेळायचा. अशा परिस्थितीत जेव्हा तो संजीवनी क्रिकेट अकादमीमध्ये खेळण्यासाठी पोहोचला तेव्हा बंगेराने त्याला गोलंदाजी करताना पाहिले. जुनेदच्या गोलंदाजी कौशल्याने बंगेरा इतके प्रभावित झाले की त्याने जुनेदला सरावासाठी बोलावले.

मी आज जो काही आहे तो अभिषेक नायरमुळे – जुनेद खान

यानंतर जुनेद रोज तिथे गोलंदाजीचा सराव करायला यायचा. लॉकडाऊन दरम्यान भारताचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी जुनेदची प्रतिभा ओळखली. द हिंदूला दिलेल्या मुलाखतीत जुनेद म्हणाला, “अभिषेक नायर यांनी मला खूप मदत केली. आज मी जो काही आहे तो त्यांच्यामुळेच. ते नसते, तर आज मी जिथे आहे, तिथे पोहोचू शकलो नसतो. त्यांनीच माझे रिक्षा चालवणे बंद केले आणि मला संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रीत करायला सांगितले. यानंतर मी त्यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेऊ लागलो. त्यांनी मागील आयपीएलच्या हंगामात केकेआरसाठी नेट गोलंदाज म्हणून घेतले होते.”

हेही वाचा – Shan Masood : शान मसूदने १५२४ दिवसांचा दुष्काळ संपवला, दुसरे जलद शतक झळकावत टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर

जुनेद खानच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट कोणता?

यानंतर जुनेदच्या कारकिर्दीत टर्निंग पॉइंट आला, जेव्हा तो स्थानिक स्पर्धेत पीजे हिंदू जिमखानाचे प्रतिनिधित्व करताना सर्वांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरला. संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने बुची बाबू आणि केएससीए स्पर्धेसाठी जुनैदची निवड केली होती. या स्पर्धेमध्ये जुनेदने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर अखेर त्याला इराणी चषक स्पर्धेत मुंबईकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली.

हेही वाचा – IND vs BAN : भारताने पाकिस्तानला मागे टाकत केला विश्वविक्रम! नोंदवला ‘हा’ खास पराक्रम

मोहम्मद जुनेद खानची क्रिकेट कारकीर्द –

मात्र, मोहम्मद जुनेद खानने आतापर्यंत केवळ एकच प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे. तो ही इराणी चषकाच्या अंतिम फेरीत मुंबईकडून रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध खेळला आहे. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात जुनेद खानने विरोधी संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला बाद करण्यात यश मिळविले. जुनैदची गोलंदाजी कारकीर्द पाहून चाहत्यांच्या मनात एक नवी आशा निर्माण झाली आहे. आता बघायचे आहे की त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी किती संधी मिळतात?

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is juned khan who went from being a auto rickshaw driver to the mumbai fast bowler who won the irani cup 2024 vbm