Who is PV Sindhu Husband Venkat Datta Sai: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने लग्नगाठ बांधली आहे. सिंधूने रविवारी उदयपूरमध्ये हैदराबादस्थित आयटी कंपनीचे संचालक व्यंकट दत्ता साई यांच्याशी लग्नगाठ बांधली. उदयसागर तलावाच्या मध्यभागी असलेल्या हॉटेल रॅफल्समध्ये लग्नाचे सर्व विधी पार पडले. २३ डिसेंबर रोजी पीव्ही सिंधू आणि व्यंकट दत्ता साई लग्नबंधनात अडकले आहेत. क्रीडा आणि राजकारणातील काही सेलिब्रिटीही या लग्नाचे साक्षीदार होते. पण पीव्ही सिंधूचा पती व्यंकट दत्ता साई नेमका आहे कोण, जाणून घ्या.

सिंधूचे पती व्यंकट दत्ता साई हे पोसिडेक्स टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक आहेत. पोसिडेक्स टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकिय संचालक जी. टी. व्यंकटेश्वर राव यांचे चिरंजीव आहेत. फाउंडेशन ऑफ लिबरल अँड मॅनेजमेंट एज्युकेशन (FLAME) विद्यापीठातून त्यांनी लिबरल आर्ट्स अँड सायन्सेसमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बेंगळुरू येथून डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यापूर्वी २०१८ मध्ये त्यांनी याच संस्थेतून अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये बीबीए देखील मिळवले.

Prateik Babbar second marriage date out
स्मिता पाटील यांचा मुलगा करतोय दुसरं लग्न, प्रतीकच्या लग्नाची तारीख आली समोर; होणारी पत्नी कोण? वाचा…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Dodi Khan Denies Marriage Plans With Rakhi Sawant_
राखी सावंतशी तिसरं लग्न करण्यास पाकिस्तानच्या डोडी खानचा नकार; म्हणाला, “मी तुझे लग्न माझ्या…”
Rapper Raftaar is all set to tie the knot with fashion stylist Manraj Jawanda
रफ्तार दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार! घटस्फोटाच्या ५ वर्षांनी रॅपर चढणार बोहल्यावर, होणारी बायको कोण आहे? वाचा…
paaru fame Sharayu Sonawane revealed the reason behind hiding her marriage
पारूने खऱ्या आयुष्यातलं लग्न का लपवून ठेवलं होतं? कारण सांगत म्हणाली, “अचानक मी…”
who is rakhi sawant future husband pakistani actor dodi khan
राखी सावंत आता पाकिस्तानची होणार सून! अभिनेत्रीचा होणारा नवरा डोडी खान आहे तरी कोण? जाणून घ्या…
Kanyadaan Fame Marathi Actor Wedding
‘कन्यादान’ फेम अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला विवाहसोहळा! पत्नीचं सिनेविश्वाशी आहे खास कनेक्शन, पाहा फोटो
Neeraj Chopra Wedding Who is Himani Mor Tennis Player Wife of India Golden Boy
Neeraj Chopra Wife: कोण आहे नीरज चोप्राची पत्नी? टेनिसपटू आणि आता आहे मॅनेजर; अमेरिकेत घेतेय शिक्षण

हेही वाचा – PV Sindhu Wedding: पीव्ही सिंधूने बांधली लग्नगाठ, विवाह सोहळ्यातील पहिला फोटो आला समोर

व्यंकट दत्ता साई यांच्या व्यावसायिक प्रवासात JSW मधील कार्यकाळाचा समावेश आहे, जिथे त्यांनी संस्थेच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) संघ दिल्ली कॅपिटल्सचे व्यवस्थापन केले. २०१९ मध्ये पोसिडेक्समध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी Sour Apple Asset Management चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले.

PV Sindhu & Venkat Datta Sai Wedding Photo
PV Sindhu & Venkat Datta Sai Wedding Photo

हेही वाचा – Smriti Mandhana: स्मृती मानधनाचा विश्वविक्रम, २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिली महिला फलंदाज

पीव्ही सिंधूच्या वडिलांनी सांगितले होते की, दोन्ही कुटुंब एकमेकांना आधीच ओळखत होते, पण नोव्हेंबरमध्ये सर्व काही ठरलं होतं. सिंधूच्या वडिलांनी पीटीआयला सांगितले होते की तिचे जानेवारीपासूनचे वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे, त्यामुळे हीच योग्य वेळ होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांनी २२ डिसेंबरला लग्न समारंभ करण्याचे ठरवले. यापूर्वी दोघांनी १४ डिसेंबरला साखरपुडा केला होता.

Story img Loader