Sai Sudarshan who made his debut in the Indian team : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना आज जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळला जात आहे. नुकतीच झालेली तीन सामन्यांची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत संपली. या मालिकेत केएल राहुल भारतीय संघाचा कर्णधार आहे, तर एडन मार्कराम दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करत आहे. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याच निर्णय घेतला. भारताकडून या सामन्यात साई सुदर्शनला वनडे पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
साई सुदर्शन आज, रविवार १७ डिसेंबर रोजी भारतीय संघासाठी पदार्पण करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच साई सुदर्शनला आपली दमदार कामगिरी दाखवण्याची संधी आहे. साई सुदर्शनने आयपीएल तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. याच कारणामुळे त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत निवड करण्यात आली. कर्णधार केएल राहुलने सामन्यापूर्वी तो खेळणार असल्याची पुष्टी केली होती. त्याने साई सुदर्शनला पदार्पणाची कॅपही दिली.
Sai Sudarshan is getting emotional for his international debut in 1st ODI vs South Africa and part of #teamindia ??#INDvsSA #SAvIND #RohitSharma #MumbaiIndians #HardikPandya #RuturajGaikwad #JayShah #SanjuSamson #MSDhoni #KLRahul#SaiSudarshan pic.twitter.com/Owe9qAD6WR
— Cric_Lover ? (@ankit_bhattar) December 17, 2023
साई सुदर्शनचा जन्म १५ ऑक्टोबर २००१मध्ये चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करतो. सुदर्शन हा ज्या कुटुंबातून आला आहे, ते पाहता खेळ त्यांच्या रक्तातच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याचे वडील एक खेळाडू होते ज्यांनी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (ढाका) भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याचबरोबर आई राज्यस्तरीय व्हॉलीबॉलपटू राहिली आहे.
हेही वाचा – IND vs SA : एबी डिव्हिलियर्सचा मोठा खुलासा! ‘या’ भारतीय खेळाडूमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली
२२ वर्षीय साई सुदर्शनने आतापर्यंत १२ प्रथम श्रेणी, २५ लिस्ट ए आणि ३१ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने मल्टी-डे फॉरमॅट क्रिकेटमध्ये ८४३ धावा केल्या आहेत आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये १२६९ धावा केल्या आहेत. त्याने ३१ टी-२० सामन्यांमध्ये ९७६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये आयपीएल धावांचाही समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ६ शतके झळकावली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १५४ धावा आहे. आता या डावखुऱ्या स्टायलिश फलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली ताकद दाखवावी लागणार आहे.
हेही वाचा – IPL 2024 : कर्णधार करत असाल तर येतो, हार्दिकच्या या अटीने गेलं रोहितचं कर्णधारपद
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन –
Debut for @sais_1509 ? ?
— BCCI (@BCCI) December 17, 2023
? Here's #TeamIndia's Playing XI ?
Follow the Match ▶️ https://t.co/tHxu0nUwwH #SAvIND pic.twitter.com/ZyUPgQzO8d
ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), संजू सॅमसन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि आवेश खान.
? ? That Moment when @sais_1509 received his #TeamIndia cap ? from captain @klrahul! ? ?
A moment to cherish for the youngster! ? ?
Go well! ? ?#SAvIND pic.twitter.com/opR6AP9h7Z— BCCI (@BCCI) December 17, 2023