Swapnil Kusale won Bronze in Olympic 2024 : नेमबाज स्वप्नील कुसाळेने आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. त्याने नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताने तीन पदके जिंकली असून तिन्ही नेमबाजीत आली आहेत. तसेच पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे हा पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे. यापूर्वी २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये जॉयदीप कर्माकरने या स्पर्धेत चौथे स्थान पटकावले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हा विक्रम प्रस्थापित करणारा हा स्वप्नील कुसाळे कोण आहे? जाणून घेऊया.

कोण आहे स्वप्नील कुसाळे?

स्वप्नील कुसाळे हा कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील कांबळवाडी येथील रहिवासी असून तो शेतकरी कुटुंबातील आहे. स्वप्नीलने २००९ मध्ये शूटिंगला सुरुवात केली. त्याच्या वडिलांनी त्याला महाराष्ट्राच्या प्राथमिक क्रीडा प्रबोधिनीमध्ये दाखल केले आणि वर्षभरानंतर स्वप्नीलने नेमबाजीला आपले करिअर म्हणून निवडले. शूटिंगमध्ये झोकून दिल्यानंतर स्वप्नीलने मागे वळून पाहिले नाही आणि २०१३ मध्येच त्याला लक्ष्य स्पोर्ट्सकडून प्रायोजकत्व मिळाले.

Actor Saif injured in knife attack has successfully operated and is out of danger
सैफ अली खानवर यशस्वी शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभागात उपचार सुरू, प्रकृतीत सुधारणा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Rishabh Pant to play Ranji Trophy after 7 years
टीम इंडियाचा ‘हा’ विस्फोटक फलंदाज ७ वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार, जैस्वाल-गिलही देशांतर्गत सामने खेळण्यासाठी सज्ज
Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”
chandrapur tirupati balaji loksatta news
बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा, पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून…

बुलेट्स खरेदीसाठी पैसे नसल्याने बँकेकडून कर्ज घेतले –

स्वप्नील कुसाळेचे वडील आणि भाऊ दोघेही शिक्षक आहेत. त्याचबरोबर त्याची आई गावची सरपंच आहे. स्वप्नीलने जेव्हा शूटिंगला त्याचे क्रीडा करिअर म्हणून निवडले, तेव्हा त्याच्याकडे बुलेट घेण्यासाठीही पैसे नव्हते. पण, सराव थांबू नये, यासाठी त्याच्या वडिलांनी बँकेकडून कर्ज घेतले आणि बुलेट्स खरेदीसाठी पैसे दिले. तेव्हा एक बुलेटची किंमत १२० रुपये असायची. त्यामुळे स्वप्नीलला नेमबाजीचा सराव करताना प्रत्येक बुलेट काळजीपूर्वक वापरावी लागायची. कारण अधिकचा खर्च परवडणारा नव्हता. स्वप्नीलनेही वडिलांना निराश केले नाही आणि आज त्याने पदक जिंकून वडिलांसह सर्वांचे स्वप्न सत्यात उतरवले.

हेही वाचा – Swapnil Kusale : मराठमोळ्या स्वप्नील कुसळेने रचला इतिहास; ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पटकावलं कांस्य

नेमबाज नाही, तर धोनी स्वप्नीलचा आदर्श –

ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरी गाठणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे एखाद्या नेमबाजाला नाही, तर भारताचा माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आपला आदर्श मानतो. धोनीच्या मैदानातील शांत आणि संयमी स्वभाव शैलीचा आपल्यावर कमालीचा प्रभाव असल्याचे स्वप्नीलने आपल्या पात्रता फेरीच्या कामगिरीनंतर सांगितले. योगायोग म्हणजे स्वप्नील धोनीप्रमाणे रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून नोकरी करतो.

स्वप्नील म्हणाला ‘‘मला रेंजवर शांत आणि संयमी राहायला आवडते. मी फारसा बोलत नाही. अचूक नेमबाजीसाठी शांत आणि संयम या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच मी धोनीचा प्रचंड चाहता आहे. क्रिकेटच्या मैदानावर सामना सुरू असताना कितीही मोठे दडपण असले, तरी धोनीचा संयम सुटलेला कधीही पाहिला नाही. मलाही असेच राहणे आवडते,’’ असेही स्वप्निल म्हणाला.

हेही वाचा – Swapnil Kusale Won Bronze : स्वप्नीलने नववीत असताना पाहिले होते ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न

ऑलिम्पिकमध्ये कसा मिळाला कोटा?

२०१५ च्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत स्वप्नीलने पहिले पदक जिंकले होते. कुवेत येथे झालेल्या या स्पर्धेत स्वप्नीलने ५० मीटर रायफल प्रोन-३ प्रकारात सुवर्णपदक जिंकून सर्वांना थक्क केले. यानंतर गगन नारंग आणि चैन सिंग या स्टार नेमबाजांना मागे टाकत स्वप्नीलने ५९ वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा जिंकली. याशिवाय तिरुअनंतपुरम येथील ६१व्या राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने वर्चस्व गाजवले आणि ५० मीटर रायफल पोझिशन-३ मध्ये सुवर्णपदक जिंकले.

२०२२ मध्ये कैरो येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत स्वप्नील कुसळेने चौथे स्थान पटकावले होते. वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कामगिरीच्या जोरावर त्याने भारताला ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला. ऑलिम्पिकमध्ये कोटा मिळाल्यानंतरही, स्वप्नीलने २०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेतील सांघिक स्पर्धेत सुवर्ण, २०२३ विश्वचषक स्पर्धेत मिश्र सांघिक

Story img Loader