WPL 2023 2nd Match RCBW vs DCW Updates: महिला प्रीमियर लीग (WPL 2023) च्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा ६० धावांनी पराभव केला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना आरसीबीला २२४ धावांचे लक्ष्य दिले होते.ज्याचा पाठलाग करताना बंगळुरू संघ २० षटकांत ८ विकेट गमावून १६३ धावाच करू शकला. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सच्या तारा नॉरिसने डब्ल्यूपीएलमध्ये ५ विकेट घेणारी पहिली गोलंदाज ठरली.

तारा नॉरिसने दिल्लीसाठी आणि महिला प्रीमियर लीगमध्ये प्रथमच ५विकेट्स घेतल्या आहेत. ताराने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीने दहशत निर्माण केली. तिने पहिल्या दोन षटकात ४ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. या चार बळीमध्ये अॅलिस पॅरीच्या विकेटचाही समावेश होता. ताराने पॅरीला बोल्ड करत दिल्लीला मोठे यश मिळवून दिले. ताराने आपल्या चार षटकांत केवळ २९ धावा देत ५ बळी घेतले.

Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Loksatta Lokankika, Nagpur, Loksatta Lokankika Preliminary round,
लोकसत्ता लोकांकिका : सर्जनशील अभिनयाने गाजली प्राथमिक फेरी, अंतिम फेरी १२ डिसेंबरला
Mohammed Siraj Statement on Travis Head Sendoff Incident Said Its a lie that he said well bowled to me
Siraj on Travis Head Fight: “हेडने सांगितलं ते खोटं आहे…”, मोहम्मद सिराजचं ट्रॅव्हिस हेडच्या वादावर मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?
anmol kharb
अनमोल, सतीशसह अश्विनी-तनिषा अंतिम फेरीत

कोण आहे तारा नॉरिस?

तारा नॉरिस २४ वर्षांची आहे, ती एक अमेरिकन खेळाडू आहे. डावखुरी वेगवान गोलंदाज नॉरिसला डीसीने लिलावात १० लाख रुपयांना विकत घेतले. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रातील असोसिएटेड नेशन्समधील ती एकमेव खेळाडू आहे. त्याचबरोबर या लीगमध्ये सहभागी होणारी ती अमेरिकेतील एकमेव खेळाडू आहे. पदार्पणाच्या सामन्यात तिने ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे, ते पाहता स्पर्धेच्या अखेरीस ती स्टार म्हणून उदयास येईल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

२०२१ मध्ये अमेरिकेसाठी पदार्पण केले –

डावखुरा वेगवान गोलंदाज तारा नॉरिसचा जन्म ४ जून १९९८ रोजी फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया, यूएसए येथे झाला. २०२१ मध्ये, तिने ब्राझील विरुद्ध अमेरिकेसाठी आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पण केले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. यशाच्या पायऱ्या चढतच राहिली. आतापर्यंत खेळलेल्या ५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिने ७.७५ च्या सरासरीने आणि १.७२ च्या इकॉनॉमीने ४ बळी घेतले आहेत.

हेही वाचा – WPL 2023 GG vs UPW: हरलीन देओलची दमदार फलंदाजी; गुजरात जायंट्सचे यूपी वॉरियर्ससमोर १७० धावांचे लक्ष्य

यासह ताराने पाकिस्तानच्या सोहेल तनवीरच्या स्पेशल क्लबमध्ये तिची जागा पक्की केली आहे. विशेष म्हणजे सोहेलच्या नावावर आयपीएलच्या इतिहासात पहिले ५ बळी घेण्याचा विक्रम आहे. सोहेलने हा पराक्रम ४ मे २००८ रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध केला होता. त्याने हा पराक्रम राजस्थान रॉयल्सकडून खेळताना केला होता.

Story img Loader