Rohit Sharma and Teammates in The Great Indian Kapil Sharma Show Video: भारताच्या टी-२० विश्वचषक २०२४ संघाचा कर्णधार आणि संघातील काही मोजके खेळाडू नेटफ्लिक्सवरील द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो मध्ये उपस्थित राहणार आहेत. रोहित शर्माबरोबर सूर्यकुमार यादव, अर्शदीप सिंह, शिवम दुबे आणि अक्षर पटेल दिसणार आहेत. या एपिसोडचा एक प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये एक असा प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर सर्वच खेळाडूंची प्रतिक्रिया पाहण्याजोगी होती.

भारतीय खेळाडू मैदानावर जितके गंभीर होऊन खेळत असतात. तितकेच दिलखुलास आणि मजा मस्ती करणारे आहेत. या कपिल शर्मा शो मध्ये खेळाडूंची हाच दिलखुलासपणा आणि त्यांची मजा मस्ती पाहायला मिळत आहे. रोहित शर्माच्या विसरभोळेपणावर यादरम्यान एक प्रश्न विचारण्यात आला ज्याच्यावर सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. तर रोहित शर्माच्या उत्तरानेही एकच हशा पिकला.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

हेही वाचा – Women’s T20 World Cup: T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची जोरदार तयारी, पहिल्या सराव सामन्यात वर्ल्ड चॅम्पियनचा केला पराभव; जेमिमा-पूजाची चमकदार कामगिरी

टीम इंडियाचा गजनी कोण?

द ग्रेट इंडियन कपिल शोचा दुसरा सीझन सुरू झाला आहे. त्याचे दोन भागही प्रसारित झाले आहेत. आता या सीझनचा तिसरा एपिसोड नेटफ्लिक्सवर ५ ऑक्टोबरला प्रसारित होईल. ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि अर्शदीप सिंह यांसारखे काही स्टार क्रिकेटर्सही शोमध्ये सहभागी होणार आहेत. तिसऱ्या पर्वाचा प्रिव्ह्यूही रिलीज झाला आहे.

हेही वाचा – Musheer Khan Video: फ्रॅक्चर अन् मानेला सर्व्हायकल कॉलर… मुशीर खान अपघातानंतर वडिलांबरोबरचा VIDEO शेअर करत म्हणाला…

कपिल शर्मा शो दरम्यान, सर्व क्रिकेटपटूंना मनोरंजक प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान, शोच्या जज अर्चना पूरण सिंह यांनी ‘टीम इंडियाचा गजनी कोण’ असा प्रश्न विचारला. यावर सूर्यकुमार यादवकडे कॅमेरा जातो तेव्हा तो डोळ्यांनी रोहितकडे इशारा करत हसतो. तर इतर खेळाडूही प्रश्न ऐकून हसायला लागतात. हा प्रश्न विचारल्यावर रोहित लगेच अरे यार म्हणत हसत हाताने चेहरा लपवतो आणि थोड्या वेळाने स्वत:च बोलतो की खरंतर हे नाव माझ्यासाठीच आहे. रोहितचं हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले.

हेही वाचा – ENG vs AUS: हॅरी ब्रुकने मोडला विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत इतक्या धावा करत रचला विक्रम

याशिवाय कपिलने प्रश्न विचारला की टी-२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद जिंकल्यानंतर सर्वात जास्त पार्टी कोणी केली. सगळेच जण एकमेकांकडे बघत होते. या प्रश्नावर रोहित म्हणाला अरे ज्याचं वाटतं त्याच नाव घ्या… तर खेळाडूंनी रोहित शर्माचे नाव घेतले. यावर रोहितने उपप्रश्न केला मी…. याशिवाय खेळाडूंना काही भारतीय खेळाडूंची नावे दाखवण्यात आली आणि समोरच्या खेळाडूने अभिनय करून ते दाखवायचे आहे. यामध्ये विराट, धोनीची नाव होती तर रोहित शर्माला खेळाडू ओळखायचा होता. या शोच्या पहिल्या सीझनमध्ये रोहित शर्माने श्रेयस अय्यरबरोबर उपस्थित होता. यावर्षी इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर रोहित शर्मा श्रेयस अय्यरसह शोमध्ये आले होते.

Story img Loader