Who is Shubham Ranjane who will play in BPL 2025 : संध्या बांगलादेशमध्ये बीपीएल २०२५ (बांगलादेश प्रीमिअर लीग) चा हंगाम खेळला जात आहे. या बांगलादेश प्रीमिअर लीग २०२५ मध्ये भारताचा शुभम रांजणे खेळत आहे. तो या लीगमध्ये ढाका कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्त्व करत आहे. विशेष म्हणजे भारतीय खेळाडूंना परदेशातील लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाहीये, तरी देखील शुभम रांजणे कसा खेळत आहे आणि तू नक्की कोण आहे? याबद्दल जाणून घेऊया.
कोण आहे शुभम रांजणे?
शुभम रांजणेचा क्रिकेटचा वारसा समृद्ध आहे. त्याचे आजोबा वसंत यांनी १९५८ ते १९६४ दरम्यान भारतासाठी सात कसोटी सामने खेळलेत. त्याचबरोबर त्यांचे वडील सुभाष यांनी २९ प्रथम श्रेणी आणि ११ लिस्ट ए सामन्यांमध्ये महाराष्ट्रासाठी प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत शुभमने महाराष्ट्रासाठी १२ प्रथम श्रेणी, २३ लिस्ट ए आणि २९ टी-२० सामने खेळले आहेत. तो अष्टपैलू खेळाडू असून खालच्या फळीतील उपयुक्त फलंदाज आहे. तसेच तो उजव्या हाताचा मध्यम गती गोलंदाज देखील आहे.
शुबम रांजणेने मुंबई का सोडली?
शुभम रांजणेसाठी भारत आणि मुंबई सोडणे हा एक कठीण निर्णय होता. त्याने १२ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने २१ नोव्हेंबर २०१६ रोजी रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले होते. परंतु मुंबई संघात त्याला फारशी संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे याआधी २०१९ च्या लिलावातून त्याची राजस्थान रॉयल्सने निवड केली होती, परंतु त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर त्याने २०२१-२२ च्या हंगामात गोव्यासाठी तीन रणजी सामने खेळले.
हेही वाचा – SA20 2025 : मॅच पाहायला गेला आणि लखपती झाला, केन विल्यमसनच्या षटकाराने चाहत्याचं नशीब कसं बदललं?
शुबम रांजणेची कारकीर्द –
यानंतर त्याने गोव्यातून भारतीय क्रिकेटमधील कारकिर्दीचा शेवट केला. त्यानंतर यूएसएला जाण्याचा मोठा निर्णय घेतला. कारण त्याला माहित होते की त्याला येथे चांगल्या संधी मिळतील, म्हणून त्याने तो धोका पत्करला. कारण येथे क्रिकेटचा विकास होत आहे. क्रिकेटचा हंगाम हा १० महिन्यांचा असतो, ज्यामध्ये खेळाडूंना वेगवेगळ्या स्पर्धात्मक लीगमध्ये खेळण्याच्या अनेक संधी मिळतात. त्याला इथे मार्टिन गप्टिल, सुनील नरेन, शाई होप, फवाद आलम आणि यांसारख्या काही खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली आहे. तो जगातील विविध लीगमध्ये भाग घेत आहे.
हेही वाचा – BPL 2025 : ‘तू अजूनही ड्रग्ज घेतोस का?’, सामन्यानंतर तमीम इक्बाल आणि ॲलेक्स हेल्समध्ये मैदानातच जुंपली
आता सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. बीपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत त्याने तीन सामन्यात ढाका कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करताना ३४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर तीन विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणीत ५९५, लीस्ट ए २७८ आणि टी-२० मध्ये ३८६ धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करताना करताना अनुक्रमे १२,१४ आणि २२ विकेट्स घेतल्या आहेत.