Who is Most Successful Player in History of Olympics: पॅरिस ऑलिम्पिक येत्या २६ जुलैपासून सुरू होत आहे. जगभरातील करोडो क्रीडाप्रेमी या मोठ्या स्पर्धेसाठी उत्सुक आहेत. भारताने आतापर्यंत १० सुवर्णपदके भारताने जिंकली आहेत, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये या आकड्यात भर घालण्याचा प्रयत्न भारतीय खेळाडू करणार आहेत. ऑलिम्पिकमध्ये जगभरातील अनेक विविध खेळाडू सहभागी होत असतात. तर अशा एका खेळाडूबद्दल आज जाणून घेऊया, ज्याने ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक पदके जिंकली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Olympic 2024: पॅरिसचे ६५वर्षीय महापौर ऑलिम्पिक पूर्वी का उतरले नदीत? पाहा VIDEO

माजी अमेरिकन जलतरणपटू मायकेल फेल्प्स हा जगातील सर्वात यशस्वी ऑलिम्पिक खेळाडू आहे. या स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदके आणि पदकं जिंकण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर आहे. माजी अमेरिकन जलतरणपटू फेल्प्सचा हा विक्रम आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला मोडता आलेला नाही.

हेही वाचा – Team India: रोहित शर्मा आणि गौतम गंभीरची कर्णधार म्हणून सूर्यकुमारच्या नावाला पसंती?

ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू

मायकेल फेल्प्स हा ऑलिम्पिक स्पर्धेतील महान चॅम्पियन खेळाडू मानला जातो. ऑलिम्पिक स्पर्धेत त्याच्या नावावर २३ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण २८ पदके आहेत. २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये पाच सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकल्यानंतर फेल्प्सने जलतरणातून निवृत्ती घेतली. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्याने ८ सुवर्णपदके जिंकण्यात यश मिळविले. जो आणखी एक विश्वविक्रम ठरला. जे आजपर्यंत कोणताही खेळाडू मोडू शकला नाही. म्हणजे एकाच ऑलिम्पिकमध्ये तब्बल ८ सुवर्णपदकं जिंकण्यात कोणत्याही खेळाडूला यश आलेले नाही.

हेही वाचा – Olympic 2024: हॉटस्टार, फॅनकोड नाही तर… भारतात ‘या’ अ‍ॅपवर फ्री पाहता येणार ऑलिम्पिकचे लाईव्ह सामने, जाणून घ्या सविस्तर

फेल्प्सने ३९ जागतिक विक्रम (२९ वैयक्तिक, १० रिले) आपल्या नावे केले आहेत, FINA द्वारे मान्यताप्राप्त इतर कोणत्याही जलतरणपटूच्या तुलनेत फेल्प्सने सर्वाधिक विक्रम केले आहेत. फेल्प्सने २०१२ ऑलिम्पिकनंतर निवृत्ती घेतली. परंतु एप्रिल २०१४ मध्ये पुनरागमन केले. रिओ दि जानेरो येथील २०१६ च्या ऑलिम्पिक परेड ऑफ नेशन्समध्ये त्याची युनायटेड स्टेट्ससाठी ध्वजवाहक म्हणून निवड झाली. त्यानंतर १२ ऑगस्ट २०१६ फेल्प्सने पुन्हा निवृत्ती जाहीर केली. फेल्प्सने २०१७ मध्ये लॉरियस वर्ल्ड कमबॅक ऑफ द इयर पुरस्कार जिंकला. मायकेल फेल्प्स हा सर्वोत्कृष्ट जलतरणपटू मानला जातो आणि सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये त्याची गणना केली जाते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is the most successful olympian in the history of olympics games michael phelps earned 23 gold medals and 39 world records bdg