Gautam Gambhir Death Threat News Update: भारतीय क्रिकेट संघाता मुख्य कोच गौतम गंभीरला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ISIS काश्मीर नावाच्या संघटनेने ही धमकी दिली आहे. ज्यानंतर या संघटनेविरोधात गंभीरने गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी गौतम गंभीरने या संघटनेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आणि स्वतःची तसंच त्याच्या कुटुंबासाठी सुरक्षा पुरवा अशी मागणी केली. गंभीरला धमकी देणाऱ्या व्यक्तीला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची गौतम गंभीरने कठोर शब्दांत निंदा केली होती. त्यानंतर गौतम गंभीरला ही धमकी देण्यात आली. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमुळे गौतम गंभीर सध्या ब्रेकवर आहे. अलीकडेच तो त्याच्या कुटुंबासह युरोप दौऱ्यावर गेला होता. पण पहलगाम हल्ल्याच्या एका दिवसानंतर त्याला आता जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.
गौतम गंभीरला धमकीचा मेल पाठवणाऱ्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या तरुणाचे नाव २१ वर्षीय जिग्नेशसिंग परमार असे आहे, तो गुजरातचा रहिवासी आहे आणि इंजिनीयरिंगचा विद्यार्थी आहे. सेंट्रल दिल्ली पोलिसांच्या पथकाने जिग्नेश सिंग परमारला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान, त्याच्या कुटुंबाने सांगितले की तो मानसिक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त आहे.
पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आरोपीने हा मेल का पाठवला आणि त्यामागे इतर कोणतेही कारण किंवा व्यक्ती सामील आहे का याचा तपास केला जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या आरोपीची अधिक चौकशी सुरू असून पोलिस संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला ‘आयसिस काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्याने बुधवारी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आणि एफआयआरसाठी औपचारिक तक्रार दाखल केली आणि त्याच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागितली. ही माहिती गौतम गंभीरच्या ऑफिसमधून वृत्तसंस्था एएनआयला मिळाली. मात्र, आता पोलिसांनी गंभीरची तक्रार गांभीर्याने घेतली आहे आणि त्या धमकी देणाऱ्या व्यक्तीला शोधून काढलं आहे.