Worcestershire Cricketer Josh Baker Passes Away : इंग्लिश क्रिकेटपटू जोश बेकर याचे वयाच्या अवघ्या २० व्या जगाचा निरोप घेतला आहे. या खेळाडूने मृत्यूच्या एक दिवस आधी क्रिकेटच्या मैदानावर आपल्या शानदार गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या खेळाडूच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. या खेळाडूचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये या खेळाडूने मृत्यूच्या एक दिवस आधी काउंटी क्रिकेटमध्ये वूस्टरशायरकडून खेळताना ३ विकेट घेतल्या होत्या. त्याने एका डावात २० षटके टाकली होती. यादरम्यान ६६ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने थॉमसलाही ४७ धावांवर बाद केले होते. बेकरच्या मृत्यूबाबत सस्पेंस आहे. क्लबने त्याच्या मृत्यूची माहिती दिली आहे, परंतु बेकरचा मृत्यू कसा झाला हे उघड केले नाही. वोस्टरशायरचे मुख्य कार्यकारी ॲशले गिल्स यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. जोशच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसल्याचे ते म्हणाले.

Mohammed Shami is not selected Border-Gavaskar Trophy Squad
Mohammed Shami : मोहम्मद शमीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी का निवड करण्यात आली नाही? जाणून घ्या
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Old man died in school bus hit, Old man died in school bus hit Borivali, Borivali latest news,
बोरिवलीमध्ये बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
aparshakti khurana cricket story
क्रिकेटपटू व्हायचं स्वप्न, पण झाला अभिनेता, वडिलांनी बॅटने दिलेला चोप; स्वतःच केला खुलासा
Australian Cricketer Cartwright Leaves Match Mid Way For Birth of His Child Then Returns to Win Match
बाळाच्या जन्माची माहिती मिळताच सामना अर्धवट सोडून गेला क्रिकेटपटू अन् मग…, क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला असा अनोखा प्रसंग
India Bowling Morne Markel Tunrs Net Bowler for KL Rahul Ahead of IND vs NZ 2nd Test Said Need To Remind Myself That I Am 40 Watch Video
VIDEO: “मी ४० वर्षांचा झालोय हे कळायला…”, केएल राहुलसाठी बॉलिंग कोच मोर्ने मॉर्कल झाला नेट बॉलर, पाहा काय म्हणाला?
Student Fell From Hotel third Floor
Hyderabad : मित्राच्या वाढदिवसाला गेला, कुत्र्यासोबत खेळता खेळता तोल गेला अन्…; ‘त्या’ हॉटेलमध्ये विद्यार्थ्याबरोबर घडलं अघटित!
Samson's disclosure about Rohit Sharma
Sanju Samson : मी फायनल खेळणार होतो पण टॉसच्या आधी १० मिनिटं… संजू सॅमसनने सांगितला किस्सा

वेल्स क्रिकेट बोर्डाने व्यक्त केला शोक –

जोश बेकरच्या निधनानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने शोक व्यक्त केला आहे. मंडळाने सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला. कौंटी संघानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. वूस्टरशायरने एक्सवर लिहिले, “जोश बेकरचे वयाच्या २० व्या वर्षी निधन झाल्याचे सांगताना वूस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबला अतिशय दुःख होत आहे. आम्ही सर्वजण जोशच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत.

हेही वाचा – वेस्ट इंडिजच्या स्टार फलंदाजावर आयसीसीने घातली ५ वर्षांची बंदी, मॅच फिक्सिंगसह ७ मोठे आरोप झाले सिद्ध

जोश बेकरची कारकीर्द –

बेकरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे, तर तो प्रभावी ठरला आहे. जोश बेकरने २०२१ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने यावर्षी लिस्ट ए मध्येही पदार्पण केले. त्याने २०२२ मध्ये कारकिर्दीतील पहिला टी-२० सामना खेळला होता.त्याने २२ प्रथम श्रेणी सामन्यात ४३ विकेट्स घेतल्या आहेत. बेकरची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे ५१ धावांत ४ विकेट्स घेणे आहे.

हेही वाचा – SRH vs RR : OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या वादग्रस्त निर्णयामुळे कुमार संगकारासह चाहतेही संतापले

त्याने १७ लिस्ट ए सामन्यात २४ विकेट्स घेतल्या आहेत. यासोबतच टी-२० सामनेही खेळला आहे. त्याने ८ सामन्यात ३ विकेट्स घेतल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे बेकरने फलंदाजीसोबतच गोलंदाजीमध्येही शानदार कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४११ धावा केल्या आहेत. या काळात त्याने २ अर्धशतके झळकावली आहेत.