बीसीसीआयने शुक्रवारी मोठा निर्णय घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. बोर्डाने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय वरिष्ठ निवड समितीची हकालपट्टी केली. चेतन शर्मा (उत्तर विभाग), हरविंदर सिंग (मध्य विभाग), सुनील जोशी (दक्षिण विभाग) आणि देबाशिष मोहंती (पूर्व विभाग) यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. चेतन शर्मा निवड समितीचे प्रमुख असल्याने त्यांच्या कार्यकाळात भारत दोन आयसीसी स्पर्धांमध्ये विजेतेपदाविना परतला. टीम इंडिया टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झाला त्याआधी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध अंतिम फेरीत पराभूत झाला. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.

बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समिती बरखास्त करून नवीन निवड समितीसाठी अर्ज मागवले. यासाठी अनेक दिग्गज सज्ज झाले आहेत. दोन माजी यष्टिरक्षक आणि एक माजी वेगवान गोलंदाज यासाठी अर्ज करू शकतात, अशी माहिती आहे. याशिवाय एका माजी लेगस्पिनरचे नावही चर्चेत आहे. दरम्यान याव्यतिरीक्त नव्या निवड समितीचा शोध सुरू असून त्यासाठी अनेक नावं समोर येतायत. या नावांनुसार टीम इंडियाचे पुढील निवड समितीचे प्रमुख बनू शकतात. नुकतंच माजी क्रिकेटपटू अजित आगरकरचे नाव पुढे आलं होतं. तर आता या यादीत आणखी काही नवीन नावांची भर पडलीये.

rss bjp tussle ends maharashtra vidhan sabha election 2024
वादावर पडदा, RSS भाजपासाठी मैदानात; विधानसभेसाठी यंत्रणा कार्यान्वित!
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
NCP Ajit Pawar Candidates
Full List of NCP AP Candidates : अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांची यादी एका क्लिकवर, कोणाला कुठून उमेदवारी?
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…
ubt mla vaibhav naik face nilesh rane kudal in assembly constituency
लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस
Ajit pawar on NCP BJP Alliance
Gautam Adani BJP-NCP Alliance Talks : “राष्ट्रवादी-भाजपाच्या युतीच्या बैठकीत गौतम अदाणीही होते”, अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा

हेही वाचा :   IND vs NZ: “ही अविश्वसनीय…” सूर्यकुमार यादवच्या खेळीचे ऋषभ पंतने केले या चार शब्दात कौतुक

टीम इंडियाने माजी क्रिकेटपटू नयन मोंगिया यांनी एका संकेस्थळाशी संवाद साधताना पुष्टी केलीये. यामध्ये त्यांनी राष्ट्रीय निवडकर्ता पदासाठी अर्ज करणार असल्याचं म्हटलंय. त्यांच्याशिवाय माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि सलील अंकोला हे देखील या शर्यतीत सहभागी होण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा :   IND vs NZ: “सूर्या जगातील…” न्यूझीलंडच्या पराभवानंतर कर्णधार केन विलियम्सनने केले कौतुक

बीसीसीआय निवड समितीचा कोण असेल प्रमुख

शिवरामकृष्णन यांनी गेल्या वर्षीही अर्ज केला होता पण कर्नाटकचा डावखुरा फिरकीपटू सुनील जोशीने त्यांचा पराभव केला होता. यावेळी या लेगस्पिनरचा समितीत समावेश केला जाऊ शकतो. बीसीसीआयच्या नियमानुसार ज्या व्यक्तीला कसोटी सामना खेळण्याचा सर्वाधिक अनुभव असेल तो मुख्य निवडकर्त्याच्या खुर्चीवर बसेल. शिवरामकृष्णन यांनी नऊ कसोटी आणि १६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. मोंगियाने भारतासाठी ४० कसोटी आणि १४० एकदिवसीय सामने खेळले आहेत. अंकोलाने भारतासाठी एक कसोटी आणि २० एकदिवसीय सामने खेळले आहेत. तो सध्या मुंबईचा मुख्य निवडकर्ता आहे.