महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या रविवारी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रतिष्ठेच्या सरकार्यवाहपदासाठी ठाण्याचे रमेश देवाडिकर आणि सांगलीचे गणेश शेट्टी यांच्यात थेट लढत होणार आहे. दोन्ही व्यक्तींचा संघटन क्षेत्रातील मैदानाशी निगडित अनुभव पाहता ही लढत चुरशीची होणार अशी चिन्हे आहेत.
बुधवारी उमेदवारीचे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी २० जणांनी माघार घेतल्यामुळे आठ जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. पुणे-ठाणेसहित मराठवाडय़ाची महायुती म्हटल्या जाणाऱ्या ‘कबड्डी विकास आघाडी’ने आठही जागांवर वर्चस्व निर्माण करीत पतंग या आपल्या निवडणूक चिन्हाला साजेशी उंच भरारी घेतली आहे. आता सरकार्यवाह पदासाठी कबड्डी विकास आघाडीचे रमेश देवाडिकर आणि गणेश शेट्टी यांच्यातील लढतीकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. सध्याची महायुतीची ताकद लक्षात घेता देवाडिकर यांचे पारडे जड आहे. परंतु एअर इंडियात कार्यरत असणाऱ्या आणि विमान हेच चिन्ह घेऊन लढणाऱ्या शेट्टी यांच्याकडे चमत्कार घडविण्याची क्षमता आहे. मागील निवडणुकीच्या वेळीसुद्धा शेट्टी यांनी आपल्या करिष्म्याच्या बळावर संयुक्त कार्यवाहपद पटकावले होते. पण यावेळी टक्कर देवाडिकर यांच्याशी आहे. महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत कार्य करणारा निष्ठावान कार्यकर्ता अशी देवाडिकर यांची ओळख आहे. संयुक्त कार्यवाह पदाच्या पाच जागांसाठी कबड्डी विकास आघाडीचे सुनील जाधव, प्रकाश बोराडे, मुझफ्फर अली अब्बास अली सय्यद, उत्तमराव इंगळे आणि मंगल पांडे हे पाच उमेदवार लढणार आहेत. याचप्रमाणे विश्वास मोरे धनुष्य आणि रवींद्र देसाई उगवता सूर्य या चिन्हांसहित रिंगणात आहेत.
कौन बनेगा सरकार्यवाह?
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या रविवारी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रतिष्ठेच्या सरकार्यवाहपदासाठी ठाण्याचे रमेश देवाडिकर आणि सांगलीचे गणेश शेट्टी यांच्यात थेट लढत होणार आहे. दोन्ही व्यक्तींचा संघटन क्षेत्रातील मैदानाशी निगडित अनुभव पाहता ही लढत चुरशीची होणार अशी चिन्हे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-04-2013 at 04:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who will become working in chief