Rohit Sharma Press Conference On Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 साठी टीम इंडियाचा संघ आज सोमवारी जाहीर करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून दुखापतग्रस्त असलेला श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराहचं आशिया कपमध्ये पुनरागमन झालं आहे. प्रसिद्ध कृष्णाचाही टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारा नवखा खेळाडू तिलक वर्मालाही आशिया चषकसाठी संधी देण्यात आलीय. टीम इंडियाची घोषणा केल्यानंतर बीसीसीआयचे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

टीम इंडियासाठी चौथ्या नंबरवर कोणता खेळाडू फलंदाजी करणार? या प्रश्नावर उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला, “आम्हाला अशा खेळाडूंची गरज आहे, जे कोणत्याही नंबरवर चांगली फलंदाजी करू शकतात. मी या पोझिशनवर चांगला खेळतो, असं म्हणणारा कोणताच खेळाडू संघात असला नाही पाहिजे. आम्हाला असे खेळाडू हवे आहेत, जे गरजेनुसार कोणत्याही नंबरवर फलंदाजी करू शकतात. हे फक्त आत्तासाठी नाही, तर मागील अनेक वर्षांपासून अशीच रणनिती राहिली आहे. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे. कोणत्याही प्रकारचं क्लब क्रिकेट नाही.

नक्की वाचा – आगामी वनडे वर्ल्डकपबाबत रविचंद्रन अश्विनचं मोठं विधान, म्हणाला, “माझी एकच इच्छा…”

संघाला जेव्हा गरज असेल, त्यावेळी खेळाडू कोणत्याही नंबरवर खेळण्यासाठी सज्ज असले पाहिजेत. नंबर 4 साठी कोणत्याही एका खेळाडूला निश्चित केलं नाहीय आणि या नंबरसाठी टीम इंडियाला फक्त एकाच खेळाडूवर अवलंबून राहायचं नाही. आम्हाला खेळाडूंमधील कौशल्य बाहेर काढायचं आहे. कुणालाच सेट पोजिशन दिलेली नाही. याबाबत खेळाडूंना सांगण्यात आलं आहे की, कोणत्याही नंबरवर फलंदाजी करण्यासाठी त्यांनी सज्ज राहावं.”

आशिया चषकसाठी ‘असा’ आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज प्रसीध कृष्णा.