Jasprit Bumrah Replacement: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या स्पर्धेला येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. पण या आयसीसी स्पर्धेपूर्वी सर्वच संघांना खेळाडूंच्या दुखापतीचा मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघही जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे चिंतेत आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत सर्व संघांना त्यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्क्वॉडमध्ये बदल करण्याची संधी आहे. पण जसप्रीत बुमराहबाबत अद्याप कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जसप्रीत बुमराहला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या अखेरच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. यासाठी त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला. पण अखेरच्या सामन्यात बुमराहच्या पाठीमध्ये वेदना होत असल्याने सामन्याबाहेर पडला आणि पुन्हा गोलंदाजीसाठी उतरला नाही.

सध्या सुरू असलेल्या भारत वि इंग्लंड तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाने बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या या वेगवान गोलंदाजीबरोबर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून हर्षित राणाला संधी दिली. हर्षित राणाला पहिल्याच वनडे सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. पण आता चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी जर बुमराह फिट झाला नाही तर त्याच्या जागी भारतीय संघात कोणाला संधी मिळू शकते, जाणून घ्या.

मोहम्मद सिराज

बुमराहच्या अनुपस्थितीत टीम इंडियासाठी पहिला पर्याय मोहम्मद सिराज असेल. सिराजची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात निवड झालेली नाही. पण मोहम्मद सिराज हा जसप्रीत बुमराहबरोबर भारताचा महत्त्वाचा गोलंदाज राहिला आहे. पण बुमराह खेळला नाही तर तो टीम इंडियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघाचा भाग होऊ शकतो. सिराज हा अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ४४ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २४.०४ च्या सरासरीने ७१ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय तो वनडे वर्ल्डकप २०२३ मध्येही खेळला आहे.

हर्षित राणा

मोहम्मद सिराजनंतर भारताकडे हर्षित राणा हा दुसरा पर्याय आहे. सध्या हर्षित इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत टीम इंडियाकडून खेळत आहे. इंग्लंडविरूद्ध पहिल्या सामन्यात हर्षितने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर पदार्पणाच्या सामन्यातच त्याने ३ विकेट्स घेत चांगली कामगिरी केली. आतापर्यंत त्याने आपल्या कारकिर्दीत फक्त २ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ४ विकेट घेतल्या आहेत. इंग्लंड मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये हर्षितने नक्कीच विकेट घेतल्या, पण तो महागडाही ठरला आहे.

प्रसिध कृष्णा

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बुमराहच्या अनुपस्थितीत टीम इंडियाकडे तिसरा पर्याय म्हणून प्रसिध कृष्णा असू शकतो. तो एक वेगवान गोलंदाज आहे, जो टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळतो. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत १७ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २५.५८ च्या सरासरीने २९ विकेट्स घेतल्या आहेत. याचबरोबर प्रसिध कृष्णाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध अखेरच्या कसोटीत बुमराहच्या अनुपस्थितीत चांगली कामगिरी केली होती. याशिवाय त्याचा वनडे रेकॉर्डही चांगला आहे.

शार्दुल ठाकूर

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर दुखापतीनंतर भारतीय संघाबाहेर आहे.पण जसप्रीत बुमराहच्या जागी शार्दुल ठाकूर हा एक आदर्श पर्याय असू शकतो. शार्दुल एक उत्तम वेगवान गोलंदाज आहे, शिवाय तो खालच्या फळीत फलंदाजीची भूमिकाही बजावू शकतो. शार्दुलने रणजी ट्रॉफी २०२४-१५ मध्ये अष्टपैलू कामगिरी केली असून त्याने ८ सामन्यात ३९६ धावा आणि ३० विकेटही घेतले आहेत. त्याचा सध्याचा फॉर्म भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खूप महत्त्वाचा ठरू शकतो.

शार्दुलने भारतासाठी ४७ एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने ६.२२ च्या इकॉनॉमीसह ६५ विकेट्स घेतल्या आहेत, त्यामुळे त्याचा अनुभव देखील बोनस असेल.