Rishabh Pant Solve Mystery of 6 Years Old Viral Photo: भारतीय संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतर सध्या विश्रांती घेत आहे. भारताला आता चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरूद्ध टी-२० आणि वनडे मालिका खेळायची आहे. दरम्यान काही खेळाडूंची टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. तर काही खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान ऋषभ पंतने सोशल मीडियावर चाहत्यांशी गप्पा मारल्या आहेत. पंतने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) प्रश्नोत्तरांचं एक सत्र घेतलं, ज्यामध्ये त्याने २०१९ च्या वर्ल्डकप फोटोमधील मोठं रहस्य सोडवलं.
२०१९ च्या विश्वचषकादरम्यान भारतीय खेळाडूंचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक मोठं रहस्य दडलं होतं. या फोटोमध्ये हार्दिक पंड्या, एमएस धोनी, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि मयांक अग्रवाल आहेत. तर पंड्या सेल्फी काढत होता, त्यामुळे सर्वच जण दाटीवाटीने उभे होते. या फोटोमध्ये खेळाडू एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे होते. दरम्यान ऋषभ पंतच्या खांद्यावरही कोणीतरी हात ठेवला आहे, पण नेमका कोणी हात ठेवला याचा अंदाज नव्हता येत. त्याच्यामागे मयंक अग्रवाल उभा आहे. पण तो फार लांब होता आणि त्याला पाहून असं वाटतंही नव्हतं की त्याने पंतच्या खांद्यावर हात ठेवला आहे.
हेही वाचा – टीम इंडियाला मिळणार नवा फलंदाजी प्रशिक्षक? गौतम गंभीरच्या कोचिंगवर प्रश्नचिन्ह, BCCI मोठा निर्णय घेणार
त्यामुळे ‘ऋषभ पंतच्या खांद्यावर कोणाचा हात आहे?’ याचीच चर्चा सर्वत्र सुरू होती. आता ६ वर्षांनंतर पंतने या रहस्यमयी फोटोमागचं सत्य उघड केलं आहे. या खेळाडूंनी हा फोटो २०१९ च्या विश्वचषकादरम्यान बॉईज डे आऊट दरम्यान काढला होता, परंतु हा फोटो पंतच्या खांद्यावरील हाताच्या रहस्यामुळे चांगलाच व्हायरल झाला.
हेही वाचा – IND vs ENG: पाकिस्तान वंशाच्या इंग्लंड खेळाडूला भारत व्हिसा नाकारला, भारत दौऱ्यात खेळू शकणार?
या फोटोमागे ऋषभ पंतच्या अगदी मागे कोणी नाही, पण तरीही त्याच्या डाव्या खांद्यावर हात ठेवलेला दिसत आहे. काल म्हणजेच १५ जानेवारीला, ऋषभ पंतने चाहत्यांना #AskRP सह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रश्न विचारण्यास सांगितले. ऋषभ पंतने लिहिले, “थोडा वेळ मिळाला आहे आणि बरीच उत्तरे मिळाली. तुमचे प्रश्न #AskRP सह विचारा.”
हेही वाचा – IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
त्यानंतर एका चाहत्याने तोच फोटो शेअर करत ऋषभ पंतला विचारले, “सर्वात मोठे रहस्य सोडव. तुझ्या खांद्यावर हात कोणाचा होता?” ऋषभ पंतने या प्रश्नाच्या उत्तरात मयंक भाईचा असं उत्तर दिलं आणि त्याच्या नावाच्या जागी त्याला टॅग केलं आहे. अशारितीने ६ वर्षांपूर्वीचं हे रहस्य उलगडलं आहे.
२०१९ च्या वर्ल्डकपमधील भारताचा प्रवास अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून झालेल्या मानहानीकारक पराभवाने संपला. या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माने सर्वाधिक ६४८ धावा केल्या होत्या, पण संघाला विजेतेपद मिळवता आले नाही. एमएस धोनीचा हे शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आणि कर्णधार म्हणून विराट कोहलीचा शेवटचा एकदिवसीय विश्वचषक होता.