Condom In Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ला सुरूवात झाली असून उद्घाचन सोहळाही पार पडला आहे. यंदा ऑलिम्पिकमध्ये १० हजारांपेक्षा अधिक खेळाडू सहभागी होत आहे. पॅरिसमधील खेळाडूंसाठी आवश्यक ती सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, काही बातम्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना कंडोम आणि इंटिमसी संबंधित इतर अनेक गोष्टी दिल्या जात आहेत.
ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे पॅरिसमधील क्रीडा व्हिलेजमधील खेळाडूंना ३००,००० कंडोमचे वाटप केले जाणार आहे. यामध्ये प्रत्येक खेळाडूला सुमारे १४ कंडोम दिले जाणार आहेत. एवढेच नाही तर खेळाडूंना खास प्रकारची लव्ह किटही दिला जात आहे. कंडोम व्यतिरिक्त, त्यात इंटिमसीसाठी वेगवेगळ्या गोष्टी देखील असतील.
टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये आयोजकांनी खेळाडूंमध्ये लाखो कंडोम वितरित केल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्येही असेच एक प्रकरण समोर येत आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, पॅरिसमधील ॲथलीट्स व्हिलेजमध्ये कंडोमची पाकिटे दिसली आहेत. खेळाडूंना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सुमारे २० हजार कंडोम वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. यासोबतच १० हजार डेंटल डॅम्स आणि इंटीमसीशी संबंधित वैद्यकीय सुविधाही आयोजकांनी दिल्या आहेत.
आत्तापर्यंत सुमारे तीन लाख कंडोमचे वाटप करण्यात आले आहे जेणेकरुन खेळाडू सेक्स करताना स्वतःला सुरक्षित ठेवू शकतील. अशा बातम्या समोर आल्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक व्हिलेजला आता ‘सेक्स फेस्ट’ असेही म्हटले जात आहे.
क्रीडापटूंनी ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये जाताच त्यांच्यापैकी अनेकांनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तू म्हणजेच स्वॅग बॅग आणि टॉयलेटरी गिफ्ट बॅगची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. कॅनेडियन सारा डग्लस यांनी पोस्ट केलेल्या टिकटोक व्हिडिओमध्ये त्या कंडोमचं आगळंवेगळं पॅकेजिंगही दाखवलं आहे, याशिवाय यंदाच्या ऑलिम्पिकमधील शुभंकरचं चित्रही त्यावर आहे. त्या व्हीडिओमधील कंडोमच्या रॅपरवर लिहिले होते, “प्रेमाच्या मैदानावर निष्पक्षपणे खेळा.”
हेही वाचा – VIDEO: राहुल द्रविडचा लेक समित १८व्या वर्षी टी-२० लीगमध्ये खेळणार, लिलावात किती बोली लागली?
टोकियो ऑलिम्पिकमधील कोविड प्रोटोकॉलमुळे खेळाडूंच्या जवळीकीवर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये असे कोणतेही बंधन नाही. त्यामुळेच ऑलिम्पिक संघटना खेळाडूंसाठी सर्व प्रकारच्या सुविधांची काळजी घेत आहे. यासोबतच पॅरिस ऑलिम्पिकच्या स्पोर्ट्स व्हिलेजसाठी अँटी सेक्स बेड बसवण्यात आले आहेत.