Sunil Gavaskar on Team India Selection: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात १२ जुलैपासून खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल आणि मुकेश कुमार या युवा खेळाडूंचा प्रथमच भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर काही वरिष्ठ खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अशा स्थितीत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय संघाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

२३ जून रोजी दुपारी टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली. जिथे वन डे संघात फारसा बदल दिसला नाही. त्याचबरोबर निवड समितीने कसोटी संघात काही मोठे निर्णय घेतले आहेत. संघाचा विश्वसनीय फलंदाज चेतेश्वर पुजाराला दोन सामन्यांसाठी कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आल्याने भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावरून गावसकर यांनी भारतीय निवड समितीवर जोरदार निशाणा साधला आहे. “वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अजिंक्य रहाणेशिवाय संपूर्ण बॅटिंग युनिट अपयशी ठरले होते, परंतु केवळ पुजाराला वगळण्यात का आले?” असे म्हणत गावसकर यांनी निवडकर्त्यांवर टीका केली.

Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?
Uddhav Thackeray Balapur, Uddhav Thackeray Criticize BJP, Balapur,
‘भाजपने महाराष्ट्र लुटण्यासाठीच मविआ सरकार पाडले’, उद्धव ठाकरेंचा आरोप

हेही वाचा: IND vs WI: व्यस्त वेळपत्रकामुळे वेस्ट इंडिज बोर्ड अडचणीत! WC क्वालिफायर अन् भारताविरुद्धचे सामने खेळाडूंना फोडणार घाम

गावसकर यांनी संघ निवडीवर सडकून टीका केली

WTC फायनल २०२३ मधील पुजाराची फलंदाजी खूप वाईट होती, त्याने दोन्ही डावात अनुक्रमे १४ आणि २७ धावा केल्या. या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी तो ससेक्सकडून काऊंटी क्रिकेट खेळला होता परंतु भारतीय जर्सीमध्ये त्याचा फॉर्म फारसा काही परतल्याचे दिसले नाही, तो अयशस्वी ठरला. काऊंटी आणि देशांतर्गत क्रिकेट खेळत असल्याने पुजारा भविष्यातही पुनरागमन करू शकेल, असे गावसकर यांना वाटते.

गावसकर यांनी स्पोर्ट्स टुडेशी बोलताना सांगितले, “होय, तो काउंटी क्रिकेट खेळत असून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत त्याला संघात कसे परत यायचे हे माहित आहे. ३९ किंवा ४० वर्षांपर्यंत लोक कसोटी खेळू शकतात. त्यात काहीही चुकीचे नाही कारण आताचे सर्व खेळाडू हे खूप फिटनेसविषयी जागरूक असतात. जोपर्यंत तुम्ही धावा करत आहात आणि विकेट्स घेत आहात, तोपर्यंत वय ही मोठी समस्या असू नये असे मला वाटत नाही.”

माजी भारतीय कर्णधार गावसकरांनी विराट आणि रोहितच्या निवडीवरून बीसीसीआयच्या निवड समितीवर टीका केली. ते म्हणाले की, “कर्णधार रोहित शर्मा (१५ आणि ४३), विराट कोहली (१४ आणि ४९) आणि शुबमन गिल (१३ आणि १८) हे देखील ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठ्या सामन्यात अपयशी ठरले होते परंतु केवळ पुजारालाच बाहेरचा रस्ता का दाखवण्यात आला? नेहमी त्यालाच बळीचा बकरा का बनवण्यात येते?”

हेही वाचा: IND vs PAK: “आम्ही २४ तास प्रवास केला…”, ४-० पराभव पचवता आला नाही म्हणून पाकिस्तानने सुरू केले बहाणे

गावसकर पुढे म्हणाले की, “मी स्पष्टपणे सांगतो जो नियम पुजारा लावला तोच नियम तुम्ही विराट कोहली आणि रोहित शर्माला का नाही लावला? फक्त एक व्यक्ती वगळण्यात आली आहे बाकीचे काय यशस्वी झाले आहेत? माझ्यासाठी फलंदाजी अपयशी ठरली. अर्थात, दोन्ही डावात ८९ आणि ४६ धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणेशिवाय इतर कोणीही धावा केल्या नाहीत. त्यामुळे कोहली आणि रोहितला ही संघाच्या बाहेर काढायचे होते.”