इंडियन प्रीमियर लीगच्या ( आयपीएल ) १६ वा हंगाम २०२३ साली पार पडणार आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएलला सुरूवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापूर्वी २३ डिसेंबरला कोची येथे आयपीएलचा लिलाव पार पडेल. त्यासाठी संघात कायम ठेवलेल्या आणि बाहेर काढलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायला बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे. चारवेळा आयपीएल जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्सने ही यादी जाहीर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज ( १५ नोव्हेंबर ) संघात ठेवलेल्या आणि बाहेर काढलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याचा अखेरचा दिवस आहे. चेन्नई सुपर किंग्सने बीसीआयकडे आपली यादी सादर केली आहे. त्यानुसार, कर्णधार एसएस धोनी, रवींद्र जडेजा, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, दीपक चहर, डेवॉन कॉन्वे, मुकेश चौधरी आणि ड्वेन प्रिटोरिय यांना संघात कायम ठेवण्यात आलं आहे.

हेही वाचा : १८ वर्षांहून कमी वयाच्या पत्नीबरोबर लैंगिक संबंध ठेवणं ठरणार ‘वैवाहिक बलात्कार’?

तर, ख्रिस जॉर्डन, नारायण जदगीशन, अॅडम मिल्ने आणि मिचेल सँटनर यांना संघातून बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे २०२३ साली होणाऱ्या आयपीएलमध्ये हे खेळाडू चेन्नई संघाकढून खेळताना दिसणार नाही आहे. पण, अंबाती रायडू आणि रॉबिन उथप्पा यांची संघात ठेवण्यात आलेल्या यादीत नाहीत अथवा त्यांना फ्रँचायझीने सुद्धा सोडलं नाही. मग यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून खेळताना दिसणार असणार की नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

हेही वाचा : भूकंप येणार हे कुत्र्या-मांजरांना व इतर प्राण्यांना माणसांच्या आधीच कसं कळतं?

पण, २०२३ साली होणाऱ्या आयपीएलमध्ये अंबाती रायडू आणि रॉबिन उथप्पा चेन्नई संघाकडून खेळताना दिसणार ‘नाही’ आहेत. काही महिन्यांपूर्वीच अंबाती रायडू आणि रॉबिन उथप्पा यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळण्यासाठी ते अपात्र ठरतात. याच कारणाने चेन्नईच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायडू यांचा समावेश नाही आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why ambati rayudu and robin uthappa wont feature for csk ipl 2023 ssa