Why Champions Trophy Winner Team Receive Special White Blazers with Trophy: भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा करंडक आपल्या नावे केला आहे. न्यूझीलंड संघाचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत ४ विकेट्सने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केलाच. यादरम्यान भारताला विजयानंतर मेडल्स देण्यात आले आणि त्यानंतर आयकॉनिक पांढऱ्या रंगाचं जॅकेट देण्यात आलं. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेत्या ट्रॉफी आणि बक्षिसाची रक्कम तर मिळतेच पण त्याचबरोबर विजयी संघाला पांढऱ्या रंगाचे ब्लेझर्सही घातलं जात. पण विजयी संघ हे ब्लेझर्स का घालतात, जाणून घ्या.
आयसीसीने १४ जानेवारीला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठीचा एक नवीन प्रोमो जारी केला होता. यामध्ये पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू वसीम अक्रम होता. त्याचबरोबर यापूर्वी झालेल्या वनडे सामन्यांचे काही व्हीडिओ होते. याचसह आपण एक पांढऱ्या रंगाचा ब्लेझर तयार होताना देखील या व्हीडिओमध्ये पाहिलं. या ब्लेझरच्या खिश्यावर यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा लोगोदेखील आहे.
आयसीसीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अक्रमने या स्पर्धेचा वारसा सांगितला होता. आठ संघांच्या नुकत्याच झालेल्या कामगिरीबद्दलही त्यांनी भाष्य केले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजेत्या संघाला ट्रॉफीसह पांढरा ब्लेझर दिला जातो. याची सुरूवात २००९ मध्ये करण्यात आली आणि त्यानंतर प्रत्येक वेळी विजेत्या संघाच्या खेळाडूंना हा ब्लेझर घातला जातो.
२०१३ मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरचे फोटो टीम इंडियाच्या चाहत्यांच्या मनात अजूनही ताजे आहेत. पण हे ब्लेझर फक्त चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर का देतात? आयसीसीच्या मते, प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो आणि हा पांढरा कोट याचेच प्रतिनिधित्व करते. या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आणि चॅम्पियन बनण्यासाठी प्रत्येक सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना परिपूर्ण असलेल्या संघात पराभूत करत चॅम्पियन्स होण्याचा सन्मान मिळवतात, म्हणून विजयी संघाला हा कोट दिला जातो. यामुळेच आयसीसी प्रत्येक चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्याला सामन्यानंतर सादर करते आणि संघ केवळ ट्रॉफीसाठीच नाही तर प्रतिष्ठित पांढऱ्या कोटसाठी देखील खेळतात.
CHAMPIONS ????#TeamIndia pic.twitter.com/5fjltfyBB6
— BCCI (@BCCI) March 9, 2025
आठ वर्षांच्या कालावधीनंतर खेळवल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीस्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही. अव्वल आठ संघांमध्ये १५ सामन्यांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली होती. पण अ संघातील दोन्ही गट भारत-न्यूझीलंड अंतिम फेरीत पोहोचले.