ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने कॅमेरून ग्रीनला व्यस्त वेळापत्रकापूर्वी थकवा येण्याच्या शक्यतेबद्दल चेतावणी दिली आहे. त्याने असे म्हटले आहे की अष्टपैलू खेळाडूला आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये त्याच्या प्रतिनिधित्वाबाबत ‘मोठा निर्णय’ घ्यावा लागेल. ग्रीन, ज्याने आधीच आयपीएल लिलावासाठी स्वतःची नोंदणी केली आहे, त्याला जवळपास अर्धा हंगाम भारतात घालवण्याची अपेक्षा आहे.
कारण आयपीएल व्यतिरिक्त ग्रीन भारतात ४ कसोटी आणि २ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी त्याला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर देखील जावे लागणार आहे. आयपीएल 2023 मध्ये सहभागी होण्याचा ग्रीनचा, इरादा पुढील महिन्यात कोची येथे होणाऱ्या मिनी-लिलावामधील १० फ्रँचायझींमधील बोली प्रक्रियेत दिसून येईल.
सप्टेंबरमध्ये, ग्रीनने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात २१४.५४च्या स्ट्राइक रेटने २ दमदार अर्धशतके झळकावली होती. वॉर्नर म्हणाला, “माझ्या दृष्टिकोनातून हे खूप चांगले आहे. खेळण्याच्या दृष्टिकोनातून त्याला ४ कसोटी सामने आणि नंतर काही एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. १९ आठवड्यांची त्याची (ग्रीन) भारताची पहिला दौरा देखील आव्हानात्मक असू शकते.
पर्थमध्ये डेव्हिड वॉर्नरने क्रिकेट डॉट कॉम एयूला सांगितले की, ”मी यापूर्वी अशा आव्हानात्मक कार्यक्रमांचा सामना केला आहे. मी कसोटी मालिका आणि (IPL 2017) मध्ये भाग घेतला आहे. त्यानंतर तुम्हाला इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामने खेळावे लागतील. त्यानंतर मला वाटते की तुम्हाला दक्षिण आफ्रिकेला जाण्यासाठी आणि वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यासाठी फक्त २० दिवसांचा वेळ मिळेल.”
मॅक्सवेलने २०१९ मध्ये घेतला होता ब्रेक –
वार्नरने अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचे उदाहरण देखील दिले, ज्याला २०१९ च्या शेवटी व्यस्त क्रिकेट वेळापत्रकांमुळे मानसिक आरोग्यासाठी विश्रांती घ्यावी लागली होती. वॉर्नर म्हणाला, “मॅक्सवेलने काही वर्षांपूर्वी असेच केले होते, आधी संपूर्ण वर्ष खेळले आणि नंतर हंगाम आला तेव्हा ब्रेक घेतला. युवा खेळाडूंच्या दृष्टिकोनातून हे पूर्णपणे आव्हानात्मक आहे. आता निर्णय त्यांना घ्यायचा आहे.”
कॅमेरून ग्रीनचे व्यस्त वेळापत्रक –
आयपीएल २०२३ हंगाम खेळण्यापूर्वी, ग्रीन वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या कसोटी मालिकेत खेळेल. पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया संघासोबत ४ कसोटी सामन्यांसाठी भारतात येण्यापूर्वी तो त्याच्या बीबीएल संघ पर्थ स्कॉचर्सकडूनही खेळू शकतो. यानंतर ३ वनडे होतील. आयपीएल संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया ५ सामन्यांच्या ऍशेस मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचल्यास ते ६ कसोटी सामने होऊ शकतात. ऑक्टोबरमध्ये भारतात होणार्या एकदिवसीय विश्वचषकात भाग घेण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा ऑगस्टमध्ये पांढ-या चेंडूंचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा आहे.