IND vs ENG Arshdeep Singh apologizes to Yuzvendra Chahal : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव करत ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अर्शदीप सिंगसह वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा यांनीही भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अर्शदीपने दोन्ही इंग्लिश सलामीवीरांना स्वस्तात बाद करून दमदार सुरुवात करुन दिली. त्याने ४ षटकात केवळ १७ धावा देत या दोन विकेट्स घेतल्या. आता बीसीसीआयने वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या शानदार स्पेलसह, त्याने इतिहास घडवला आणि टी-२० मध्ये ९७ विकेट्ससह भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. अनेक दिवसांपासून संघाबाहेर असलेल्या युझवेंद्र चहलला त्याने मागे टाकले आहे. मात्र, हा विक्रम मोडल्यानंतर अर्शदीपने चहलची माफीही मागितली असून, त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

अर्शदीप सिंगने चहलची का मागितली माफी?

बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती एकमेकांचे कौतुक करताना दिसत आहेत. दरम्यान, जेव्हा अर्शदीप सिंगला ऐतिहासिक कामगिरीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा डाव्या हाताच्या गोलंदाजाने सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त केली आणि भविष्यातही अशी कामगिरी सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. शेवटी त्याने युझवेंद्र चहलचा विक्रम मोडल्याबद्दल त्याची सॉरी युझी भाई म्हणत माफी मागितली.

अर्शदीप सिंग वरुण चक्रवर्तीचे कौतुक करताना म्हणाला की, “वरूण आजकाल उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे, कारण टी-२० मध्ये मधल्या षटकांमध्ये विकेट घेणे खूप महत्वाचे असते. जर फलंदाज त्यावेळी बाद झाले नाही, तर ते नंतर जलद धावा करु शकतात. ज्यामुळे डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणे कठीण होते, परंतु वरुण आल्यापासून त्याने मधल्या षटकांमध्ये खूप विकेट्स घेतल्या आहेत. मला आशा आहे की तो असाच विकेट्स घेत राहील.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did arshdeep apologize to yuzvendra chahal after ind vs eng 1st t20i bcci shared video